पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा
तर शोएब याला सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आवडायची असा खुलासा करण्यात आला आहे.
आज (16 जून) भारत (India) विरुद्ध पाकिस्तानचा (Pakistan) सामना रंगणार आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित अश्या या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी पाकिस्तान माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचे एक गुपित उघड झाले आहे. तर शोएब याला सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आवडायची असा खुलासा करण्यात आला आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सनुसार, शोएब अख्तर याने सोनाली बेंद्रे हिला प्रथम अंग्रेजी बाबू देसी मॅम या चित्रपटातून पाहिले होते. त्यानंतर त्याने एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे मला आवडत असून एकेकाळी तिचा फोटो माझ्या पाकिटात असायचा असे म्हटले. त्याचसोबत शोएबने राहत्या खोलीत सोनालीचे फोटोसुद्धा भिंतींवर लावले असल्याचा खुलासा केला आहे.
मात्र शोएबच्या या उत्तरानंतर सोनाली हिला या बद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी सोनाली हिने शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटरला ओळखत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तर आज दुपारी 3 वाजल्यापासून भारत विरुद्ध पाकिस्ताच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण आजचा सामना पाहण्यात उत्सुक असणार असल्याचे एकूण चित्र दिसून येत आहे.