अभिनेत्री Taapsee Pannu आणि दिग्दर्शक Anurag Kashyap यांच्या घरावर आयकर विभागाचा छापे

आयकर विभागाने बुधवारी अनुराग प्रॉडक्शन हाऊस फॅंटम फिल्म्सच्या संदर्भात अनुराग कश्यप, विकास बहल आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापा टाकला.

Taapsee Pannu, Anurag Kashyap (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि मुंबईतील चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.आयकर विभागाने बुधवारी अनुराग प्रॉडक्शन हाऊस फॅंटम फिल्म्सच्या संदर्भात अनुराग कश्यप, विकास बहल आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापा टाकला. या सेलिब्रेटींच्या मुंबई सोडून इतर 20 ठिकाणी एकाचवेळी छापा टाकला जात आहे. कर चुकवल्या कारणाने आयकर विभागाने छापे टाकल्याचं म्हटलं जात आहे. (वाचा - Heropanti 2: टायगर श्रॉफने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; पहिल्या लूकसह सांगितली 'हीरोपंती 2'च्या प्रदर्शनाची तारीख)

ANI ट्विट - 

सध्या अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू आयकर विभागाच्या रडारखाली आले आहेत. आयकर विभागाने आज सकाळी मुंबईतील त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानी झडती घेतली. कर चुकवण्यासंदर्भात तपास करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. अनुराग कश्यप आणि विकास बहल यांच्यासह फॅन्टम फिल्म्सची सह-मालकी असलेली निर्माता Madhu Mantena ही आयकर विभागाच्या रडारखाली आला आहे.