सिनेमात काम मिळाले नाही, तर फिल्मसिटीमध्ये कॅन्टीन सुरू करील; सुशांत सिंह राजपूतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर (Social Media) त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हि़डिओमध्ये सुशांत 'सिनेमात काम मिळालं नाही, तर फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करीन, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करील,' असं सांगत आहे. सुशांतचा हा व्हिडिओ व्हायरल भयानी (Viral Bhayani) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Sachin Tendulkar/Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर (Social Media) त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हि़डिओमध्ये सुशांत 'सिनेमात काम मिळालं नाही, तर फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करीन, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करील,' असं सांगत आहे. सुशांतचा हा व्हिडिओ व्हायरल भयानी (Viral Bhayani) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुशांत म्हणाला आहे की, 'जेव्हा मी टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडली तेव्हा मी विचार केला होता की, मला जर सिनेमात काम मिळाले नाही, तर मी फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करील, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करेन.' नेपोटिझमचा वाद सुरू झाल्यानंतर सुशांतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईचे सलमान खान वर गंभीर आरोप; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

#SushantSinghRajput speaks about the challenges he face and the hard work he put in in this #throwback video #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या व्हिडिओमध्ये सुशांत पुढे म्हणाला आहे की, 'मी माझ्या पहिला सिनेमा 'काय पो छे'साठी 12 वेळा ऑडिशन दिली होती. तसचं दुसरा सिनेमा 'पीके' साठी 3 वेळा ऑडिशन दिली होती आणि माझा तिसरा सिनेमा यशराज बॅनरचा होता. त्यासाठी मी 1 महिना वर्कशॉप केलं होते. त्यानंतर ऑडिशन दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी अभिषेक, आदित्य चोप्रा किंवा हिरानी यांनी माझं टीव्हीवरील काम पाहिलं नव्हतं. त्यांना मी कोण आहे, हे देखील माहित नव्हतं. त्यांनी केवळ माझे ऑडिशन व्हिडीओ पाहून माझी निवड केली होती. त्यामुळे आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता असेल, तर या क्षेत्रात कोणीही यशस्वी ठरू शकतं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Who Is Priya Saroj? प्रिया सरोज कोण आहे? वय, संपत्ती आणि राजकीय पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाच्या खासदाराबद्दल सर्व काही घ्या जाणून, रिंकू सिंहसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त

Saif Ali Khan Attack Case: रक्ताने माखलेल्या सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरने सांगितली संपूर्ण कहाणी; नेमक काय घडलं? जाणून घ्या

Khel Ratna Award 2025: मनु भाकर, गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान

IND W vs IRE W, 1st ODI Match 2025 Key Players: टीम इंडिया आणि आयर्लंडमध्ये शुक्रवारी रंगणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील दिग्गज खेळाडूंवर

Share Now