Hundred Trailer: 'रिंकू राजगुरु'चा हिंदी वेबसिरिज 'हंड्रेड'द्वारे डिजिटल डेब्यू; लारा दत्तासोबत गुप्तहेर बनून उडवली धमाल (Video)

सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेल्या रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरली आहे. सैराटनंतर रिंकूने कधीच मागे वळून पहिले नाही, इतकेच नाही तर ती मराठीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली

Hundred Trailer (Photo Credit : Youtube)

सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेल्या रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरली आहे. सैराटनंतर रिंकूने कधीच मागे वळून पहिले नाही, इतकेच नाही तर ती मराठीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली. आता रिंकू राजगुरू वेबसिरीजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहे. नुकताच रिंकूच्या नव्या वेब सिरीजचा हंड्रेड (Hundred) चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यावर फक्त एकच शब्द बाहेर पडतो तो म्हणजे, वाह! रिंकूसोबत ‘हंड्रेड’मध्ये लारा दत्ता (Lara Dutta) देखील महत्वाच्या भूमिकेत आहे व या दोघींनी मिळून जी काही कमाल दाखवली आहे, ती ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

Hundred Trailer -

रिंकूने या सिरीजमध्ये नेत्रा पाटील नावाच्या टिपिकल मराठी मुलीची भूमिका साकारली आहे. नेत्रा एक अशी मुलगी आहे, जिच्या डोळ्यांत स्वित्झर्लंडला जाण्याची स्वप्ने आहेत, ती बॉलिवूड चित्रपटाने प्रेरित झाली आहे. मात्र एके दिवशी तिला समजते की, तिला एका आजार आहे व तिच्याकडे फक्त 100 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर मात्र तिचे आयुष्य बदलून जाते. याच काळात तिला भेटते एसीपी सौम्य शर्मा, अर्थात लारा दत्ता. सौम्य शर्मा नेत्राला एक गुप्तहेर म्हणून काम देते आणि त्यानंतर या दोघी काय धमाल उडवतात ते ही सिरीज पाहिल्यावरच समजेल.

25 एप्रिलपासून डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी (Disney+ Hotstar VIP) वर ही सिरीज पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ट्रेलरमधून सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, दिग्दर्शन, शॉट टेकिंग आणि रिंकूचा अभिनय. 2.9 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये इतक्या गोष्टी घडत असतात की तुमचे लक्ष एका सेकंदासाठीही विचलित होत नाही. (हेही वाचा: TikTok साठी शिल्पा शेट्टी चा झालेला हा अवतार पाहून तुम्हीही क्षणभर व्हाल अवाक्, Watch Video)

Pyar Karona सलमानच्या आवाजातील गाणे चाहत्यांच्या भेटीला; युट्यूब चॅनलचा केला शुभारंभ - Watch Video

ही एक विनोदी अ‍ॅक्शन सिरीज़ आहे, ज्याची कहाणी दोन भिन्न व्यक्तिमत्वे असणाऱ्या स्त्रियांभोवती फिरत असते. या शोचे शूटिंग मुंबईतील खऱ्या लोकेशन्सवर झाले असून, त्याचे दिग्दर्शन रुची नारायण, आशुतोष शाह आणि ताहिर शब्बीर यांनी केले आहे. या सिरीजमध्ये लारा दत्ता आणि रिंकूशिवाय करण वाही, सुधांशु पांडे, परमीत सेठी, रोहिणी हट्टंगडी, अरुण नलावडे आणि मकरंद देशपांडेसुद्धा दिसणार आहेत. या वेब सीरिजमध्ये एकूण आठ एपिसोड पाहायला मिळतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now