Honey Singh Death Threat Call: गोल्डी ब्रारने हनी सिंगला दिली जीवे मारण्याची धमकी, सिंगरने दिल्ली पोलीस आयुक्तांची घेतली भेट (Watch Video)

पोलिसांनी व्हॉईस नॉटचा तपास सुरू केला आहे.

Honey Singh (Photo Credit - Twitter)

गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldie Brar) प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगला (Honey Singh) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कॅनडामध्ये बसलेल्या या गुंडाने व्हॉईस नोट पाठवून धमकी दिली आहे, ज्याची तक्रार त्याने दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलकडे केली आहे. पोलिसांनी व्हॉईस नॉटचा तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयात पोहोचून तक्रार नोंदवल्यानंतर हनी सिंगने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मला परदेशी नंबरवरून कॉल आला होता आणि काही व्हॉइस नोट्स मिळाल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांकडे या व्हॉईस नोट्सची चौकशी करून सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

यासोबतच तो म्हणाला, 'मला सध्या फार काही सांगण्यास मनाई करण्यात आली आहे. हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडले आहे. मला भीती वाटते माझे संपूर्ण कुटुंब घाबरले आहे. मला फक्त मृत्यूची भीती वाटते.'' (हे देखील वाचा: Lust Stories 2 Trailer: 'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर रिलीज, Tamannah Bhatia आणि Vijay Verma यांच्यातील रोमँटिक सीन शूट (Watch Video)

पहा व्हिडिओ

गोल्डी ब्रार हा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. त्याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. या वर्षी मार्चमध्ये त्याने सलमान खानला ईमेल पाठवून धमकी दिली होती, ज्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवली होती.