सनी लिओनी चा मोहक लुक पाहिलात का? (Photos Inside)
ती नेहमीच आपल्या सोशल मीडिया अपडेट्सद्वारे फॅन्सना तिच्या प्रेमात पाडत असते.
Sunny Leone's Stunning Look: सोशल मीडियावर बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे सनी लिओनी. ती नेहमीच आपल्या सोशल मीडिया अपडेट्सद्वारे फॅन्सना तिच्या प्रेमात पाडत असते. अलीकडेच सनीने तिच्या ट्विटर हॅण्डलद्वारे काही सेक्सी फोटो शेअर केले आहेत जे पाहून कदाचित तुमच्या हृदयाचा ठोका देखील चुकू शकतो.
सनीने या फोटोंमध्ये एक ब्लू सॅटिन स्लिप ड्रेस परिधान केला आहे. आपल्या या लूकबद्दल सनीने कॅप्शनमधून न लिहिता, तिने त्याऐवजी फक्त एक इमोजी वापरली. हे फोटो पाहिल्यावर आपल्या मनाची स्थिती या इमोजीमधून परफेक्ट स्पष्ट होते.
सनी सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये एक आहे, यामागचे कारण म्हणजे ती सतत सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना आपल्या आयुष्यातील लेटेस्ट घडामोडींबद्दल अपडेटेड ठेवत असते.
या लूकसाठी तिने स्वत:च्याच ब्रँडचा म्हणजे स्टार स्ट्रकचा मेकअप वापरला आहे. तिचा ब्लू सॅटिन मिनी-स्लिप ड्रेस हा फॉरेव्हर 21 या ब्रँडचा आहे. विशेष म्हणजे सुंदर दिसण्यासाठी तिला खूप महागड्या अशा ब्रँडची किंवा डिझायनरच्या ड्रेसची आवश्यकता नव्हती. हा ड्रेस घेण्यासाठी आपल्याला फक्त 1800 रुपये द्यावे लागले असल्याचे सनीने सांगितले आहे. तिने घातलेले पिवळे कानातले तिच्या ड्रेससोबत अगदी कॉन्ट्रास्ट होत आहेत.
'सलमान खान'चा भाची आयत सोबतचा पहिला फोटो शेअर करताना बहीण अर्पिता शर्मा हिने लिहिली 'ही' भावुक पोस्ट
सनी लिओनी लवकरच ‘वीरमादेवी’ या चित्रपटात दिसणार आहे. सन 2020 मध्ये प्रवेश करताच निर्मात्यांनी तिच्या चित्रपटाचा एक लूक रिलीझ केला होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तिने अलीकडे अर्जुन पटियालामध्ये एक कॅमिओ केला होता आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स सीझन 2 या वेब सीरिजमध्ये एक विशेष भूमिका साकारली होती.