Sapna Choudhary Dance Video: हरयाणवी डान्सर सपना चौधरी ने घागऱ्यावर केला हॉट डान्स; लॉकडाऊन काळात घरात राहून करतीय आपल्या चाहत्यांचे मनोरंजन
सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

Sapna Choudhary Dance Video: हरयाणी डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थिती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. अलीकडेचं सपनाने तिचे नवीन हरयाणवी सॉन्ग 'घागरा' (Ghagra Song) रिलीज केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला. इंटरनेटवर तिने या गाण्याला प्रोत्साहन देणारा आपला नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती घरात लाल रंगाचा घागरा घालून नाचताना दिसत आहे.

सपनाने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना सपनाने लिहिलं आहे की, 'घुंगरु' गाण्याला मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. घुंगरुवरील सर्वोत्कृष्ट व्हिडिओ कोण बनवितो ते पाहूया. घरातील टीव्हीवर या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्ले करून सपना या गाण्यावर थिरकता दिसत आहे. (वाचा - Rahul Vaidya ने Disha Parmar सोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ; सिंगरने सुंदर अंदाजात घेतले चुंबन)

सपनाचे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल होत आहे. या गाण्यावर लोक त्यांचे फनी डान्स व्हिडिओही शेअर करत आहेत. आई झाल्यानंतरही सपनाने आपले काम पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

दरम्यान, सपनाने एकापाठोपाठ एक असे आपली बरीच गाणी रिलीज केली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांचा खूप प्रेम मिळाले आहे. सपना प्रत्येक वेळी आपल्या जबरदस्त अंदाज आणि देसी स्टाईलमुळे चाहत्यांची मन जिंकत असते.