Priyanka - Nick Wedding : Nick Jonas चं भारतात आगमन, प्रियांकाने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला खास फोटो !
तर 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीनुसार प्रियांका आणि निक लग्न करणार आहे.
Priyanka - Nick Wedding : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लवकरच निक जोनास (Nick jonas) या अमेरिकन पॉप स्टार सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. आज अमेरिकेहून निक जोनास भारतामध्ये दाखल झाला आहे. दिल्लीमध्ये उतरलेल्या निकचा फोटो प्रियांकाने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. दिल्लीमध्ये निक आणि प्रियांका पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देणार आहे. येत्या 2 डिसेंबरला निक आणि प्रियांकाचा हिंदू रीती रिवाजांनुसार विवाह होणार आहे. तर 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीनुसार प्रियांका आणि निक लग्न करणार आहे. priyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज
निक आणि प्रियांकाच्या लग्नासाठी लंडनच्या राजघराण्याची सून आणि प्रियांकाची मैत्रीण मेगन मार्कल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र यावर अजूनही कोणाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आज सिद्धार्थ रॉय कपूरने दिलेल्या माहितीनुसार प्रियांका लग्नाच्या पुर्व संध्येपर्यंत सिनेमाचं शूटिंग करणार आहे.
जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा पार पडेल. त्यासाठी दोन्ही कुटुंबाकडून तयारी जोमात सुरु आहे. हिंदू रीति-रिवाजानुसार होणाऱ्या लग्नात प्रियांका अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहे. तर ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नात Ralph Lauren ने प्रियांकाचा वेडिंग गाऊन डिझाईन केला आहे.