Gauahar Khan's Father Passes Away: अभिनेत्री गौहर खान हिचे वडील जफर अहमद खान यांचे निधन
गेल्या काही दिवसांपासून जफर खान यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
Gauahar Khan's Father Passes Away: अभिनेत्री गौहर खान हिचे वडील जफर अहमद खान (Zafar Ahmed Khan) यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जफर खान यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गौहर खाने हिने आपल्या वडीलांची प्रकृती ठिक होण्यासंदर्भात आपली इच्छा व्यक्त करणारी एक पोस्ट सुद्धा सोशल मीडियात केली होती. त्याचसोबत चाहत्यांना सुद्धा वडीलांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे अपील केले होते.
गौहर हिचा जवळीक मित्र प्रीती सिमोस यांनी ही दु:खद बातमी इंस्टाग्रामवर शेअर करत त्यांची आठवण सुद्धा काढली आहे. प्रीतिने एक व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की, गौहर आपल्या आई-वडिलांना शंभर वर्ष आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करत आहे. पुढे असे म्हटले आहे की, माझ्या गौहरचे पप्पा. असे एक व्यक्ती ज्यांच्यावर मी प्रेम करत होती ते नेहमीच शानदार जगले आणि त्यांची पूर्ण आदराने नेहमीच आठवण काढली जाईल. परिवारासोबत माझ्या संवेदना आणि प्रेम.(Amitabh Bachchan Health Update: शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला लेटेस्ट फोटो; म्हणाले -' दृष्टीहीन आहे दिशाहीन नाही')
गेल्या वर्षात गौहर हिच्या वडिलांना एका सर्जरीसाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. तर दोन दिवसांपूर्वी गौहर हिने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर सुद्धा केला होता.
गौहर हिच्या वडीलांच्या निधनाची बातमी ऐकून जय भानुशाली, माहि विज, सुगंधा मिश्रा यांच्यासह काही लोकांनी त्यांच्या आत्माला शांती मिळो अशी प्रार्थना केली असून परिवाराच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.