Ganeshotsav 2020: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी झाले गणपती बाप्पांचे आगमन; मोठ्या भक्तिभावाने सुरु झाली गणेशोत्सवाची तयारी (Watch Video)
यंदा 22 ऑगस्ट पासून देशभरात गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2020) सुरुवात होत आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या घरी गणपती बसवून हा उत्सव साजरा होतो,
यंदा 22 ऑगस्ट पासून देशभरात गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2020) सुरुवात होत आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या घरी गणपती बसवून हा उत्सव साजरा होतो, तसेच बॉलीवूडमधील अनेक सेलेब्जही आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. आता नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) घरी दोन दिवस आधीच गणपतीचे आगमन झाले आहे. शिल्पा शेट्टीने आज आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणली, सध्या सोशल मिडियावर या गोष्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.
प्रत्येक वर्षी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या घरातील गणेशोत्सव हा अतिशय खास असतो. यामध्ये शिल्पा शेट्टीचा देखील समावेश आहे. आज शिल्पाने मोठ्या भक्तिभावाने चिंचपोकळी येथून गणपतीची मूर्ती आणली आहे. यावेळी ती गुलाबी रंगाच्या भारतीय पेहरावात दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाप्पांची मूर्ती घेऊन येताना तिने पूर्ण सावधगिरी बाळगली होती. गणपतीची मूर्ती घरात घेताना शिल्पा शेट्टीने चेहऱ्यावर मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ह्ज घातलेले दिसून आले. (हेही वाचा: दिग्दर्शक रवी जाधव व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी साकारला Eco Friendly बाप्पा (See Photos & Video))
पहा व्हिडिओ -
शिल्पासाठी यावर्षीचा गणेशोत्सव अतिशय खास ठरणार आहे, कारण हा उत्सव तिची मुलगी समिशाचा पहिलाच गणपती उत्सव असणार आहे. दरवर्षी शिल्पा, तिचा नवरा राज कुंद्रा आणि मुलगा वियान गणेश उत्सव साजरा करतात. दरम्यान, शिल्पा शेट्टीप्रमाणेच बॉलिवूडचे अनेक स्टार्सही दरवर्षी आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. यामध्ये सलमान खान, गोविंदा, शाहरुख खान, एकता कपूर, माधुरी दीक्षित, सोनू सूद यांचा समावेश आहे. यंदाचा गणेशोत्सव जरी धुमधडाक्यात साजरा होत नसला, तरी प्रत्येकजण आपापल्या घरी हे दहा दिवस भक्तिमय वातावरणामध्ये व्यतीत करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2020 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

