Year Ender 2023: सुहाना खान ते खुशी कपूरपर्यंत 'या' स्टार किड्सनी या वर्षात केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा सविस्तर

2023 मध्ये अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तुम्हालाही या स्टार किड्सची नावे जाणून घ्यायची आहेत का? चला तर मग या स्टार किड्सनी कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ते जाणून घेऊयात. सुहाना खान - 2023 मध्ये अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तुम्हालाही या स्टार किड्सची नावे जाणून घ्यायची आहेत का? चला तर मग या स्टार किड्सनी कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ते जाणून घेऊयात.

Khushi Kapoor, Suhana Khan, Palak Tiwari (PC - Instagram)

Who Star Kids Debuted 2023: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यानंतर नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे. प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. 2023 हे वर्ष सामान्य लोक आणि चित्रपट कलाकारांसाठी खूप खास होते. 2023 मध्ये अनेक स्टार किड्सनी (Star Kids) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तुम्हालाही या स्टार किड्सची नावे जाणून घ्यायची आहेत का? चला तर मग या स्टार किड्सनी कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ते जाणून घेऊयात.

सुहाना खान -

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खानने 2023 मध्ये 'द आर्चिज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे, ज्याची देशभरात चर्चा होत आहे. या चित्रपटात सुहानाने 'वेरोनिका लॉज'ची भूमिका साकारली आहे. (हेही वाचा - Most Anticipated Films in 2024: रोमान्स, कॉमेडी आणि अॅक्शनने भरलेले असले वर्ष 2024; हे 7 चित्रपट पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर धमाल करायला तयार, घ्या जाणून)

पलक तिवारी -

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीनेही या वर्षात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक तिवारीने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. पलकने या चित्रपटात ‘मुस्कान’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

राजवीर देओल -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajveer Deol (@the_rajveer_deol)

बॉलिवूडमधील देओल कुटुंबासाठी हे वर्ष खूप खास होते. सनी देओल आणि बॉबी देओल अनेक वर्षांनंतर पडद्यावर परतले आहेत. सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलनेही या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. राजवीरने 'दोनो' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात राजवीरने 'देव सराफ'ची भूमिका साकारली होती. (हेही वाचा - स्टार किड्स सुहाना खान ने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट केलं पब्लिक; पहा शाहरुख खानच्या लाडक्या लेकीचे हटके फोटोज)

अलिझे अग्निहोत्री -

 

View this post on Instagram

 

A post shared by ali (@alizehagnihotri)

सलमान खानप्रमाणेच आता त्याची भाचीही तिच्या मामाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. अलिज अग्निहोत्रीने 'फर्रे' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अलीसे अग्निहोत्रीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला.

खुशी कपूर -

 

View this post on Instagram

 

A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)

बोनी कपूरची मुलगी आणि जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरनेही 'द आर्चिज' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात 'बेट्टी कपूर' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

अगस्त्य नंदा -

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यानेही यावर्षी 'द आर्चिज' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला आहे. या चित्रपटात अगस्त्याने 'आर्ची एंड्रयूज'ची भूमिका साकारली होती.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now