दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांची फौज तैनात

त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Ashitosh govarikar And Panipat (PC - File Image)

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Govarikar) यांचा ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ (Panipat- The Great Betrayal) हा ऐतिहासिक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्याला मराठा साम्राज्याचा इतिहास आणि पानिपतच्या युद्धाची कथा पाहायला मिळणार आहे. परंतु, सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा - Third Battle of Panipat: पानिपतच्या 3 ऱ्या लढाईपासून सुरु झाला मराठेशाहीचा ऱ्हास; जाणून घ्या या युद्धात का झाला मराठ्यांचा पराभव ?)

गेल्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, त्यानंतर लगेचचं गोवारीकरांना अज्ञात व्यक्तींच्या तसेच इतर काही संघटनाच्या धमक्या येऊ लागल्या. यातील काहींनी या चित्रपटात ऐतिहासिक पात्र आणि घटनांशी छेडछाड केल्याचा आरोप केला. तर काहींनी चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेतला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण धमक्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

हेही वाचा - Panipat Trailer: मराठेशाहीची पाळेमुळे हलवणारी पानिपतची लढाई मोठ्या पडद्यावर; ट्रेलरवरून चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज (Video)

मराठ्याच्या इतिहासात पानिपत युद्धाच्या खुणा आजही ताज्या आहेत. या युद्धात मोठी जीवितहानी झाली होती. यात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, स्त्रिया व पुरुष मरण पावले होते. तर अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर सुमारे 22 हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अफगाणिस्तानात नेले होते. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव का झाला? याचही उत्तर मिळणार आहे. या चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सॅनन पार्वतीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल आदी कलाकरा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत.