दक्षिणात्य सुपरस्टार Vijay Deverkonda याच्यासोबत Sara Ali Khan हिने पहिल्यांदाच काढला सेल्फी; पाहा फोटो

सारा ही विजय देवरकोंडाची मोठी चाहती आहे.

दक्षिणात्य सुपरस्टार Vijay Deverkonda याच्यासोबत Sara Ali Khan हिने पहिल्यांदाच काढला सेल्फी; पाहा फोटो
Vijay Deverakonda And Sara Ali Khan (Photo Credit: Instagram)

Sara Ali Khan Instagram Post: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. तसेच सारा सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सारा ही विजय देवरकोंडाची मोठी चाहती आहे. साराने लाखोंच्या मनावर राज्य करणारा विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्यासोबत पहिल्यांदाच सेल्फी घेतला आहे. तिने विजय देवरकोंडासोबत घेतलेला सेल्फीचा फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. या फोटोत विजयने राखाडी रंगाची टी-शर्ट परिधान केली आहे. तर, सारा काळ्या रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे. दरम्यान, सर्व सामन्यांसह बॉलिवूडच्या कलाकारांनीही या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साराने इंस्टाग्राम शेअर केलेला हा फोटो मुंबईमधील आहे. ज्यावेळी विजय देवरकोंडा मुंबईत दाखल झाला होता. त्यावेळी साराने विजयसोबत पहिल्यांदाच सेल्फी घेतला होता. साराने हा फोटो शेअर करताना फॅन मोमेन्ट असे कॅप्शन दिले आहे. साराने शेअर केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक्सदेखील केले आहे. हे देखील वाचा- Rasika Sunil ने बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सह अत्यंत फिल्मी स्टाईलने केले Valentine's Day सेलिब्रेशन, Watch Video

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

विजयचा अगामी चित्रपट 'लाइगर' येत्या 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, सारा अलीकडे तिच्या 'कुली नंबर 1' या चित्रपटात ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती अभिनेता वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सारा आगामी काळात 'अतरंगी रे' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर मुख्य भूमिकेत साकारणार आहेत. आनंद एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हिमांशु खुराना दिग्दर्शित हा चित्रपट क्रॉस-कल्चरल लव्ह स्टोरी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2021 07:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).