अभिनेता आयुषमान खुरानाविरोधात गुन्हा दाखल, चित्रपटाची कथा चोरी केल्याचा आरोप

सिनेमाची कथा चोरी केल्याचा आरोप करत तक्रारदार कमलकांत चंद्रा(Kamalkant Chandra) यांनी आयुषमान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Aayushman Khuranna (Photo Credits: Insta)

एकापेक्षा एक हटके चित्रपट आणि तसेच हटके विषय निवडून स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेला एक हरहुन्नरी अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या एका वेगळ्या अडचणीत सापडलाय. हटके विषय निवडण्यात नेहमीच अग्रस्थानी असलेला आयुषमान पुन्हा एकदा एक हटके विषय घेऊन आपल्यासमोर येत आहे. आयुषमान आपला आगामी चित्रपट 'बाला' (Bala) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र त्याचा हाच चित्रपट अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. या सिनेमाची कथा चोरी केल्याचा आरोप करत तक्रारदार कमलकांत चंद्रा (Kamalkant Chandra) यांनी आयुषमान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या विरोधात कलम 420 आणि कलम 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या काशिमीरा पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Bala' Movie Announcement: 

कमल कांत चंद्रा यांनी याआधीही सिनेमाच्या मेकर्सविरोधात मुंबई हायकोर्टात केस दाखल केली होती. त्यांच्या मते या सिनेमाची आयडिया त्यांच्या एका प्रोजेक्टमधून चोरण्यात आली. हा सिनेमा वय होण्याआधी टक्कल पडलेल्या व्यक्तीची कहाणी आहे. मागील महिन्यात आयुषमानने आपल्या इन्स्टाग्रामवरुन ह्या चित्रपटाची घोषणा केली होती.

त्यामुळे आधीच हायकोर्टात केस दाखल केली असताना, सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणे हे चुकीचे आहे. तसेच कोर्टाचा निर्णय येण्याआधी शूटिंगला सुरुवात करणे हा एक प्रकारचा कोर्टाचा अवमान आहे असे कमल चंद्रा यांनी म्हटले आहे.

'गुलाबो सीताबो' सिनेमात पाहायला मिळणार 'आयुषमान खुराना' आणि 'अमिताभ बच्चन' यांची सिल्व्हर स्क्रीनवर जुगलबंदी

या सिनेमासाठी आयुषमानसोबत भूमी पेडणेकरला साईन करण्यात आले आहे. तसेच या सिनेमात यामी गौतम आणि जावेद जाफरीही दिसतील. भूमी आणि आयुषमान यांचा हा तिसरा सिनेमा असेल. याआधी या दोघांनी 'दम लगा के हैशा' आणि 'शुभमंगल सावधान' या सिनेमात एकत्र काम केले होते.