Jaffer Sadiq Arrested: 2000 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी चित्रपट निर्माता जाफर सादिकला अटक

एनसीबीने सादिकचे भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कचे "किंगपिन" म्हणून वर्णन केले आहे.

Jaffer Sadiq Arrested (PC - X/ANI)

Jaffer Sadiq Arrested: दोन हजार कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जची देशाबाहेर तस्करी केल्याच्या आरोपाखाली (Drug Smuggling Case) एका चित्रपट निर्मात्याला पोलिसांनी अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी सांगितले की, दक्षिणी चित्रपट उद्योगात काम केलेले डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक (Jaffer Sadiq) याला चार महिन्यांच्या शोधानंतर अटक करण्यात आली. एनसीबीने सादिकचे भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कचे "किंगपिन" म्हणून वर्णन केले आहे.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सादिकवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 2,000 कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने 45 पेक्षा जास्त वेळा 3,500 किलो स्यूडोफेड्रिन विदेशात पाठवले होते. सादिकने आतापर्यंत चार चित्रपट केले आहेत आणि त्याचा शेवटचा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा -Elvish Yadav On Controversy: मारहाण प्रकरणावर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "लोकांनी मला आरोपी ठरवलं"

मदुराईमधील दोन रेल्वे प्रवाशांकडून आणि चेन्नईतील एका डंप यार्डमधून अधिकाऱ्यांनी 180 कोटी रुपयांचे मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते. या घटनेच्या एक आठवड्यानंतर सादिकला अटक करण्यात आली. ही औषधे श्रीलंकेत तस्करी करण्यासाठी होती, असे तपासात समोर आले आहे. 29 फेब्रुवारी रोजी प्रवासी जोडप्याकडून एकूण 36 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. (हेही वाचा - Elvish Yadav Booked For Beating Up: बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल; युट्युबरला केली होती मारहाण (Watch Video))

रिपोर्टनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या मदतीने जफर सादिकला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान ते भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे उघड झाले. सादिक या काळ्या अमली पदार्थाच्या व्यापारातून मिळालेला पैसा फिल्म मेकिंग, रिअल इस्टेट, हॉटेल आणि इतर व्यवसायात गुंतवत होता. गेल्या महिन्यात या सिंडिकेटशी संबंधित तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत सादिकचे नाव पुढे आले. त्याचे नाव बाहेर आल्यानंतर सादिक 15 फेब्रुवारीपासून फरार होता.