Haddi: कपाळावर टिकली, ओठांवर लाली असलेला नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'हड्डी' चित्रपटातील नवा लूक पाहून चाहते घायाळ; पहा फोटोज

एका यूजरने लिहिले आहे की, 'नजकत से नवाज बेगम'. त्याचप्रमाणे दुसर्‍याने लिहिले, 'तुमचे हे चित्र पाहून कोणीही म्हणू शकत नाही की हे पात्र पुरुषाने साकारले आहे.'

Nawazuddin Siddiqui (PC- Instagram)

Haddi: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा सिनेसृष्टीतील अनुभवी अभिनेता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पात्राने लोकांची मने जिंकली आहेत. खलनायक असो किंवा सकारात्मक व्यक्तिरेखा, नवाज हा असा एक अभिनेता आहे जो त्याच्या व्यक्तिरेखेत अशा प्रकारे उतरतो की, त्यावर प्रेक्षक घायाळ होतात. नवाजुद्दीन त्याच्या आगामी 'हड्डी' (Haddi) या चित्रपटातील ट्रान्सजेंडरच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातून अभिनेत्याचे दोन लूक समोर आले आहेत. आता त्याच्या तिसऱ्या लूकवरही चाहत्यांसमोर आला आहे.

'हड्डी' चित्रपटातील नवाजुद्दीनचा लेटेस्ट लूक झी स्टुडिओने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बनारसी साडी, कपाळावर टिकली, भारी दागिन्यांमध्ये दिसत आहे. नवाजच्या लेटेस्ट लूकमध्ये एक मजेदार लिरिकल कॅप्शन आहे, "गिरफ्तर तेरी आँखों में हुए जा रहे हैं हम, जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं हम." नवाजनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. (हेही वाचा - Nawazuddin Siddiqui Dream House: नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आलिशान घरात जास्त वेळ घालवू शकणार नाही, नवाजने सांगितले कारण)

'हड्डी'च्या या नव्या लूकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला पहिल्या नजरेत ओळखणे खरोखरच अवघड आहे. सध्या ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. लोक केवळ त्याच्या अभिनयाचेच कौतुक करत नाहीत तर त्याच्या लूकवरही थक्क झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

नवाजुद्दीनच्या या पात्रावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'नजकत से नवाज बेगम'. त्याचप्रमाणे दुसर्‍याने लिहिले, 'तुमचे हे चित्र पाहून कोणीही म्हणू शकत नाही की हे पात्र पुरुषाने साकारले आहे.' हड्डी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट अक्षत अजय शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. 'हड्डी' हा चित्रपट 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी नवाजुद्दीन टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती 2' चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर 'हड्डी' व्यतिरिक्त नवाजकडे 'टिकू वेड्स शेरू' प्रोजेक्टही आहेत.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif