Pradeep K Vijayan Dies: प्रसिद्ध तमिळ अभिनेते प्रदीप के विजयन यांचे निधन; चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी आढळले मृतावस्थेत
त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Pradeep K Vijayan Dies: चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेते प्रदीप के विजयन (Pradeep K Vijayan) यांचे निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रदीप के विजयन चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याचे बोलले जात आहे. या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रदीप के विजयन यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले असून त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वृत्तानुसार, प्रदीपच्या मित्राने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे सर्व कॉल्स अनुत्तरित झाले. त्यानंतर मित्र त्याला पाहण्यासाठी गेला पण अनेकदा दार ठोठावल्यानंतरही जेव्हा अभिनेत्याने दरवाजा उघडला नाही तेव्हा त्याने पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी दरवाजा तोडला असता अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. वृत्तानुसार, प्रदीपने नुकतीच श्वास घेण्यास आणि चक्कर आल्याची तक्रार केली होती. अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रदीपच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने त्यांच्या फॉलोअर्ससह सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा - Amol Kale Funeral: अमोल काळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड अभिनेता Salman Khan सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमीत दाखल)
अभिनेता आणि गायिका सौंदर्या बाला नंदकुमार यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत X खात्यावर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे की, 'हे खूपचं धक्कादायक आहे. एक भाऊ म्हणून ते खूप चांगले होते आम्ही कधीच रोज नाही बोलायचो. प्रदीप के विजयन अण्णा तुमच्या आत्म्याला शांती लाभो.' (Avadhoot Gupte Mother Death: अवधूत गुप्ते यांच्या आई मृदगंधा यांचे निधन)
अभिनेता प्रदीप नायर पप्पू या नावाने प्रसिद्ध होता. 2013 मध्ये तमिळ चित्रपट सोन्ना पुरियाथुमधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पी रमेश यांच्या 2014 मध्ये अशोक सेल्वन आणि जननी-स्टारर थेगिडीमध्ये पूर्णचंद्रन (सदागोप्पन) ची भूमिका साकारल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली.
प्रदीप शेवटचा 2023 मध्ये राघव लॉरेन्ससोबत रुद्रन या चित्रपटात दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, प्रदीप टेक ग्रॅज्युएट होता. तथापि, अभिनयाच्या आवडीमुळे त्याने चित्रपटाच्या जगात पाऊल ठेवले. 14 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या विजय सेतुपती आणि अनुराग कश्यपच्या महाराजा या चित्रपटातही त्यांची भूमिका होती.