'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद

त्यावेळी तिने युक्तिवाद केला की, ज्या व्हिडिओजसाठी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे ते व्हिडिओज अश्लील (Porn) नसून 'एरॉटिका' (Erotica) आहेत आणि असे व्हिडिओ आजकाल जवळजवळ सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत

Shilpa Shetty and Husband Raj Kundra (Photo Credits: Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]उद्योगपती राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) अश्लील फिल्म्स रॅकेट प्रकरणात त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने युक्तिवाद केला की, ज्या व्हिडिओजसाठी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे ते व्हिडिओज अश्लील (Porn) नसून 'एरॉटिका' (Erotica) आहेत आणि असे व्हिडिओ आजकाल जवळजवळ सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. हाच युक्तिवाद कुंद्राच्या वकिलाने जेव्हा मुंबई कोर्टात मांडला, तेव्हा कोर्टाने विचारले की होते की, एरॉटिकाची नक्की व्याख्या काय आहे व काय नाही हे कोण ठरवेल?

राज कुंद्राच्या पोलिस कोठडीत मुदतवाढ झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक शिल्पा शेट्टीच्या मुंबई येथील घरी चौकशीसाठी पोहोचले होते. पती अश्लील फिल्म व्यवसायात गुंतला आहे की नाही, याची माहिती शिल्पा शेट्टीला होती का, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या एका पथकाने पाच तासापेक्षा जास्त शिल्पा शेट्टीची चौकशी केली. शिल्पाने सांगितले की तिला हॉटशॉटच्या कंटेंटबाबत माहिती नव्हती आणि तिचा याच्याही काही संबंध नाही.

शिल्पाने असा दावा केला आहे की, एरॉटिका आणि पॉर्न चित्रपट वेगवेगळे आहेत, राजने अश्लील चित्रपट केले नाहीत. राज कुंद्रा हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी त्यांच्या तपासात केला आहे. त्याने केवळ 'हॉटशॉट्स' अ‍ॅप सुरू केले नाही, तर याबाबत तपास होणार असल्याचा संशय येताच हे अ‍ॅप आपला मेहुणा प्रदीप बक्षीची लंडनमधील कंपनी केनरीनला विकले. यानंतर राज मुंबईतूनच पॉर्न फिल्मचा संपूर्ण व्यवसाय बघायचा. दुसरीकडे शिल्पा सांगते की तिचा मेहुणा प्रदीप बक्षी या व्यवसायाशी निगडीत आहे, तिचा नवरा निर्दोष आहे. (हेही वाचा: राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिची पहिली पोस्ट, पहा काय लिहिले)

या शिवाय शिल्पाच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जाईल आणि ती कंपनीच्या संचालकांपैकी किती काळ काम करत होती, हे देखील पाहिले जाईल. दुसरीकडे कुंद्राने या प्रकरणात त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शुक्रवारी त्याच्या पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर व्यावसायिकाने त्याच्या अटकस ‘बेकायदेशीर’ म्हणत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.