Drugs-on-Cruise Case: आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयात घेतली होती धाव
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे
- Read in
- मराठी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आता आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जावे लागणार नाही. दिल्ली एसआयटी जेव्हा जेव्हा समन्स बजावेल तेव्हा आर्यनला चौकशीसाठी टीमसमोर हजर राहावे लागेल, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
आर्यनला दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात हजेरी लावायची होती. त्याच्या जामीन आदेशावर लिहिलेल्या 14 अटींपैकी ही एक अट होती. ही स्थिती बदलण्यासाठी आर्यनने नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेत म्हटले आहे की, आर्यनला या अटीबाबत शिथिलता दिली जाऊ शकते, कारण क्रूझ शिप ड्रग्स प्रकरण एनसीबी दिल्लीने एसआयटीकडे सोपवले आहे.
Drugs-on-cruise case | Bombay High Court relieves Aryan Khan from appearing before Mumbai NCB every week but directs him to appear before Delhi SIT whenever summoned
— ANI (@ANI) December 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2021 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

