Drugs Case: सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला, करण सजनानी यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अटक

Sushant Singh Rajput | (Photo Credits: Facebook)

Drugs Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात झालेल्या बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शनचा एनसीबीकडून पर्दाफाश केला जात आहे. आतापर्यंत एनसीबीकडून अनेक जणांना ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यासह चौकशी सुद्धा केली आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची नावे सुद्धा समोर आल्याचे दिसले आहे. अशातच आता एनसीबीने सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि उद्योगपती करण सजनानी यांना अटक केली आहे. तर गुरुवारी एनसीबीकडून जगताप सिंह याला एनसीबीने ताब्यात घेतले होते.

गुरुवारी जगताप सिंह करमजीत उर्फ केजे याचा मोठा भाऊ असून त्याला आधी अटक करण्यात आली होती. जगताप, केजे आणि अन्य काही जणांमध्ये काही ट्रान्जेक्शन सुद्धा झाल्याचा खुलासा झाला आहे. एनसीबीने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, जगताप हा ड्रग्जच्या उद्योगात सामिल होता. आता एनसीबीकडून त्याची चौकशी केली जाणार आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांतचा मित्र, Assistant Director Rishikesh Pawar चौकशी साठी एनसीबीच्या ताब्यात)

Tweet:

त्याचसोबत करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना सुद्धा एनसीबीने कार्यालयात बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी सुद्धा एनसीबीने पुष्टी केली होती की, या दोघांचा सुशांत सिंह राजपूत याच्या मृ्त्यूप्रकरणी कथित रुपात संशय होता.(सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा आडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्‍यांनी माफी मागावी: महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारच्या तीन एजेंसी तपास करत आहेत. सीबीआय, ईडी आणि एनसीबी कडून त्याचा तपास केला जात आहे. ईडीला ड्रग्ज संबंधित चॅट, त्याची खरेदी यासारखे काही इनपुट्स मिळाल्यानंतर एनसीबीने त्याचा पुढील तपास करण्यास सुरुवात केली होती. तर सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण सुशांतच्या घरातल्यांनी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले की हत्या असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरुच आहे.