Disha Patani Hot Look In Yellow Monokini: दिशा पटानी ने शेअर केला पिवळ्या रंगाच्या मोनोकिनीतील फोटो; Watch Photo
बिकिनी, मोनोकिनी (Monokini) आणि स्विमूट सूट मधील तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्ससाठी नवीन नाहीत. दिशाने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला की, या फोटोजना लाखोंमध्ये व्हूज मिळतात. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपल्या आगामी चित्रपटाविषयी आणि जीवनशैलीशी संबंधित माहिती देत असते.
Disha Patani Hot Look In Yellow Monokini: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या हॉट लूकमुळे आणि फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. बिकिनी, मोनोकिनी (Monokini) आणि स्विमूट सूट मधील तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्ससाठी नवीन नाहीत. दिशाने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला की, या फोटोजना लाखोंमध्ये व्हूज मिळतात. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपल्या आगामी चित्रपटाविषयी आणि जीवनशैलीशी संबंधित माहिती देत असते.
दरम्यान, आता आणखी एकदा दिशा पटानी तिच्या फोटोमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. दिशा पटानीने काही तासांपूर्वी पिवळ्या रंगाची मोनोकिनी (Yellow Monokini) घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला हजारोहून अधिक लाईक्स मिळाल्या असून हजारो युजर्संनी कमेंट्स दिल्या आहेत. दिशा पटानीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये जिराफ इमोजी ठेवली आहे. (हेही वाचा - Harshvardhan Rane Tested Positive for COVID-19: 'सनम तेरी कसम' स्टार हर्षवर्धन राणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती)
बाघी 3 स्टार पिवळ्या रंगाच्या ओचर कटआउट मोनोकिनीमध्ये अतिशय फिट दिसत आहे. दिशाचा हा फोटो नेमकी केव्हाचा आहे, हे अस्पष्ट आहे. परंतु, या फोटोमध्ये दिशा नेहमीप्रमाणेचं फिट आणि हॉट दिसत आहे. (हेही वाचा - Sanjay Dutt New Look: कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या अभिनेता संजय दत्त चा नवा लूक, त्याची ही अवस्था पाहून चाहते म्हणाले 'Get Well Soon')
दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, ती सध्या तिच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. भारत चित्रपटानंतर दिशा सलमान खानसोबत दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करत आहे. नुकतचं दिशा आणि सलमानने कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये काही सीन्स आणि गाण्यासाठी शुटिंग केले.