Disha Patani ने Tiger Shroff सोबत साजरा केला वाढदिवस; पहा सेलिब्रेशनचे Photos

लॉकडाऊनमुळे दिशाने घरीच सेलिब्रेशनला पसंती दिली आणि आपला खास दिवस बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ सोबत साजरा केला.

Disha Patani, Tiger Shroff & Krishna Shroff (Photo Credits: Instagram)

Disha Patani Birthday Celebration Photos:  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिचा काल (रविवार, 13 जून) रोजी वाढदिवस होता. लॉकडाऊनमुळे दिशाने घरीच सेलिब्रेशनला पसंती दिली आणि आपला खास दिवस बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत साजरा केला. सेलिब्रेशनमध्ये टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff), आई आयशा श्रॉफ (Ayesha shroff) देखील होत्या. दिशाने सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. (दिशा पटानी ने आपल्या वाढदिवसानिमित्त आपला बिकिनीतील Hot फोटोज शेअर करुन चाहत्यांना दिले छान सरप्राईज)

या फोटोजमध्ये दिशा, कृष्णा यांचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये टायगरचे कुटुंबिय दिशासाठी तिच्या कुटुंबाप्रमाणेच आहे. त्यामुळे दिशा अधिकाधिक वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करत असते. वाढदिवसानिमित्तही तिने त्यांच्यासोबत सेलिब्रेट करणे पसंत केले.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

टायगर-दिशाच्या रिलेशनशीपच्या पूर्वीपासून सुरु असलेल्या चर्चांना या फोटोजमुळे पुन्हा एकदा उधाण आले आहे. हे फोटोज चांगलेच व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. (Disha Patani च्या आज बर्थ डे दिवशी वायरल होतेय तिची ऑडिशनची क्लिप; पहा कशी होती 10 वर्षांपूर्वी दिशा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टायगर आणि दिशावर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नुकत्याच आलेल्या राधे सिनेमात दिशा पटानी सलमान खानसोबत झळकली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif