Dia Mirza चे दुसरे लग्न; बिजनेसमॅन Vaibhav Rekhi सोबत 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा लवकरच दुसरे लग्न करणार आहे. 2019 मध्ये निर्माता साहिल संघा सोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता मुंबई स्थित बिजनेसमॅन वैभव रेखी सोबत विवाहबद्ध होणार आहे.

Dia Mirza चे दुसरे लग्न; बिजनेसमॅन Vaibhav Rekhi सोबत 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात
दिया मिर्जा (Photo Credits: Instagram)

Dia Mirza Wedding: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा लवकरच दुसरे लग्न करणार आहे. 2019 मध्ये निर्माता साहिल संघा सोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता मुंबई स्थित बिजनेसमॅन वैभव रेखी (Vaibhav Rekhi) सोबत विवाहबद्ध होणार आहे. दरम्यान, यावर दिया मिर्झा कडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, अनेक मीडिया रिपोर्ट्समधून दिया फेब्रुवारी महिन्यातच विवाहबद्ध होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. (बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जा आणि साहिल संघा यांचा 11 वर्षांचे नाते संपुष्टात, See Post)

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दिया 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखी सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या विवाह सोहळ्याला दिया आणि वैभव यांचे कुटुंबिय आणि मित्रपरीवार उपस्थिती लावेल. दरम्यान, दिया गेल्या काही काळापासून वैभवला डेट करत होती. त्यानंतर आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

यापूर्वी दिया 2014 मध्ये साहिल संघा सोबत विवाहबद्ध झाली होती. परंतु, लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी मिळून 'बोर्न फ्री एंटरटेनमेंट' नावाने एक प्रॉडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. या अंतर्गत जायेद खान सोबत 'लव ब्रेकअप्स जिंदगी' हा पहिला सिनेमा निर्मित करण्यात आला. दरम्यान, तिच्या तेलुगू सिनेमा 'वाईल्ड डॉग' च्या शूटिंग सध्या सुरु असून लवकरच दिया तापसी पन्नू च्या 'थप्पड़' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2021 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).