Dia Mirza ने गर्भवती महिलांना COVID-19 Vaccine संदर्भात दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
त्यावेळी त्यांनी मला महत्त्वाची माहिती दिली
कोविड-19 लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहिम देशात युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र अजूनही अनेकांना कोविड लस संबंधी काही शंका आहेत. त्यात गर्भवती महिलांमध्ये ही लस घ्यायची की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान आई होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) ही लस गरोदर महिलांनी घ्यायची की नाही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, ही लस गरोदर महिलांनी घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. गर्भवती महिला आणि स्तनपान करणा-या महिलांनी कोरोना लस सध्यातरी घेऊ नये असे सांगण्यात आले आहे.
दिया मिर्झाने याबाबत ट्विटरवर माहिती देत सांगितले आहे की, "याबाबत सल्ला घेण्यासाठी मी माझ्या डॉक्टरांना भेटली. त्यावेळी त्यांनी मला महत्त्वाची माहिती दिली."हेदेखील वाचा- Cyclone Tauktae Update: मुंबईच्या उंबरठ्यावर आज तौक्ते चक्रीवादळ; प्रशासन अलर्ट मोड वर
"भारतात देण्यात येणारी कोरोना लसीच गर्भवती आणि स्तनपान करणा-या महिलांवर चाचणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्या डॉक्टारांनी जोपर्यंत गरोदर महिलांवर या लसीचे योग्य वैद्यकिय परीक्षण होत नाही, तोपर्यंत ही लस घेऊ नका असा सल्ला दिला आहे."
या महत्त्वाच्या माहितीकडे दुर्लक्ष करु नका असे दिया मिर्झाने गर्भवती महिलांना सांगितले आहे. सोशल मिडियावर आपली बेबी बंपवाली फोटो शेअर करुन तिने याबाबत माहिती दिली आहे. दिया मिर्झाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमन वैभव रेखी याच्याशी लग्न केले होते. त्यानंतर काही दिवसांनी तिने आपण गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.