Sushant Singh Rajput वरील सिनेमा विरोधात त्याचे वडील KK Singh यांनी केलेल्या याचिकेला दिल्ली हायकोर्टाने फेटाळले; ‘न्यायः द जस्टिस’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
‘न्यायः द जस्टिस’ हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर बेतला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे वडील कृष्णा किशोरे सिंह (KK Singh) यांची याचिका आज (10 जून) दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळली आहे. या याचिकेमध्ये सुशांत सिंह च्या वडिलांनी अभिनेत्याच्या आयुष्यावर किंवा त्याच्या आयुष्यावर प्रेरित होऊन कोणी सिनेमा बनवू नये अशी विनंती केली होती. सुशांतच्या वडिलांचा आणि त्याचा कुटुंबियांचा असा आरोप आहे की निर्माते किंवा दिग्दर्शक सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा त्यांच्या सोयीने फायदा घेऊन चित्रपट बनवू शकतात.
सुशांतच्या कुटुंबियांनी दिल्ली हायकोर्टात त्याबाबतची याचिका दाखल केली असून आज त्याची सुनावणी करताना अभिनेत्याच्या वडिलांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येवरुन सध्या अनेक चर्चा, तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेकजण आपली एक कथा रचत आहेत. यामुळे सुशांत आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात आहे असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. Sushant Singh Rajput ने लिहिलेली हँड नोट आली समोर; बहीण श्वेता कीर्ती सिंहने केली शेअर.
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाकडून दिग्दर्शक दिलीप आणि सरला सराओगी यांना कोर्टाच्या सुनावणीपर्यंत सिनेमा रिलीज न करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सिनेमा 11 जूनला प्रदर्शित करण्याचं या आधी ठरलं होतं. ‘न्यायः द जस्टिस’असं या सिनेमाचं नाव आहे.
मागील वर्षी 14 जूनला सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. सुशांत घरात बेडरूममध्ये फॅनला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला होता. त्यानंतर या मृत्यूप्रकरणाची चर्चा वाढली. मुंबई पोलिसांकडून काढून सध्या सुशांतच्या मृत्यूचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्यात आला आहे.