रणवीर, दीपिका यांचे रोमॅंटीक चॅट सोशल मीडियावर
गोडीगुलाबीनं संसार सुरु झालाय. यात रोमान्सचं म्हणाल तर, ते गृहितंच धरल्यालं. पण, हे सगळं दोघांत असावं की न्हाय. पर, ह्येंनी तर थेट सोशल मीडियावरच गप्पा हानायला सुरुवात केली. गप्पा म्हंजी आपलं चॅट हो. अन त्येबी साधंसुधं नव्हं. थेट रोमॅंटीक. झालं का.. कुणाचं म्हणून काय इचारतासा...? आवं तीच की आपली बॉलिवूडची फेमस जोडी..
त्येंच्या लग्नाचा बेंडबाजा मोठा धुमधडाक्यातच वाजला. वाजला म्हंजी काय एकदम दुनियेतच डंगा गाजला. 2018 हे वरीस तसं बॉलिवूडसाठी लग्नाचंच वरीस ठरलं म्हणा. दीपिका पदुकोन-रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा अन निक जोनस, कपील शर्मा.. जाऊंदे आपल्याला काय करायचं. त्ये तिकडं लागल्याती त्येंच्या संसाराला. आपण कशाला चर्चा करा उगीच. पण, चर्चा टाळावी तरी कशी? नवं नवं लग्न झालंय. गोडीगुलाबीनं संसार सुरु झालाय. यात रोमान्सचं म्हणाल तर, ते गृहितंच धरल्यालं. पण, हे सगळं दोघांत असावं की न्हाय. पर, ह्येंनी तर थेट सोशल मीडियावरच गप्पा हानायला सुरुवात केली. गप्पा म्हंजी आपलं चॅट हो. अन त्येबी साधंसुधं नव्हं. थेट रोमॅंटीक. झालं का.. कुणाचं म्हणून काय इचारतासा...? आवं तीच की आपली बॉलिवूडची फेमस जोडी.. दीपविर.. म्हंजीच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हो. काय सांगायचं तुमास्नी, दोघांनीपण सोशल मीडियावर जोरात चॅटाचॅटी केली म्हणं. आमच्याकडं पुरावा हाय बरं... न्हायतर तुम्ही म्हणाल ह्ये आंगचंच सांगत्याती जणू. पर तसं न्हाय. त्यांनी खरोखरच सोशल मीडियावर चॅट केलंय. ते पण रोमॅंटीक अंदाजात.
काय मंडळी इतकंबी तुमच्या ध्यानात येत न्हाय? तुमास्नी बाबा सगळंच इस्काटून सांगावं लागतं बघा. नोव्हेंबर 2018 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्न, रिसेप्शन, पार्टी सम्दा धुमधडाका आटोपला आन त्यांनी आपापल्या आयुष्याला सुरुवात केली. म्हणजे प्रोफेशनल आयुष्याला हो.. दोघंबी लै करिअर ओरियंटेड की काय म्हणत्यात ती हायती म्हणं. दीपिका हिला मिळाला नवा शिनुमा. तेच ते तुमच्या भाषेत चित्रपट. तर, रणवीर सिंग, त्योपन नव्या शिनुमातून त्येच्या फॅन्सना भेटाय ईतूय म्हणं. फॅन म्हंजी पंख नव्ह बरं. सोपीस्टीकेटेड भाषेत सांगायचं तर चाहते... चाहते... गली बॉय असं त्याच्या सिनेमाचं नाव हाय म्हणं. आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं रामायण का सांगाय लागला हाईसा.. आहो.. खरी बातमी म्होरंच हाय. आमास्नी म्हायती हाय त्येंनी काय रोमँटीक गप्पा हानल्या हे जाणून घ्यायलया तुम्ही लै उत्सुक हाय ते. तर बघाच आता. उगाज 'नमनाला घडाभर तेल कशाला' न्हाई का? (हेही वाचा, भोपाळच्या सूनबाई करीना कपूर काँग्रेसच्या तिकीटावर भाजपला देणार धक्का?)
तर मंडळी, रणवीर ह्येच्या सिनेमातलं 'तेरा टाईम आएगा' हे गाणं आगोदरच लै फेमस झालंय. हे गाणं रणवीरनंच म्हणलंय म्हंजीच गायलंय बरं का. आता ह्याच गाण्यातल्या एका फोटोवर कॉमेंट करत दीपिकानं लिव्हलंय 'तेरा टाइम आ गया बेबी' (tera time aa gaya baby). ही कॉमेंट वाचून मग रणबीरलाही ऱ्हावलं न्हाय. त्येनंबी लगींच उत्तर दिलं...'तू जो मिल गई मुझे.' खरं म्हंजी हे चॅट दोघांचा मामला. पण सोशल मीडिया म्हंजी एक सीमा नसलेली चावडी. त्यामुळं चॅट त्या दोघांच अन हुरुप चंढलाय पंख्यांना म्हंजीच त्येंच्या चाहत्यांनाहो. जाऊदे आम्हाला काय करायचं. जे आमास्नी दिसलं ते तुमास्नी सांगितलं.