Deepika Padukone Blasts at Paparazzi: गाडीचा पाठलाग करणाऱ्या पॅपराझी वर भडकली दीपिका पदुकोण; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा- रिपोर्ट
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास ड्र्ग्स एंगलने सुरु झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली. यात एक मोठे नाव होते. ते म्हणजे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे. त्यानंतर आता दीपिकाबद्दल अजून एक बातमी समोर येत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचा तपास ड्र्ग्स एंगलने सुरु झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली. यात एक मोठे नाव होते. ते म्हणजे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचे. या प्रकरणी दीपिकाची चौकशी झाली असून तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश NCB च्या रडारावर आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण बद्दल अजून एक बातमी समोर येत आहे. गाडीचा पाठलाग करणाऱ्या मीडिया फोटोग्राफर्सवर दीपिका चांगलीच भडकली असून तिने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दीपिकाचे मीडियाशी चांगले संबंध असून अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्याचे दिसून आले नव्हते. परंतु, काही गोष्टींमुळे नाराज असलेल्या दीपिकाने पॅपराझीवर आवाज चढवला. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, अलिकडेच दीपिका धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळेस गाडीचा पाठलाग करणाऱ्या फोटोग्राफर्सवर तिने आपली नाराजी व्यक्त केली. गुरुवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळी दीपिका आणि अनन्या पांडे खार येथील धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसमधून निघत होत्या. त्यावेळेस हा प्रसंग घडला.
पहा फोटो:
View this post on Instagram
Deepika spotted post meeting at Dharma office today ❤️ #deepikapadukone #gainfollowers #gainlikes
A post shared by Deepika Padukone Fanpage 👑 (@live.love.deepika) on
रिपोर्टनुसार, अनेक फोटोज मिळवूनही पॅपराझी दीपिकाच्या गाडीचा पाठलाग करत होते. दीपिका घरी जात असल्याचे समजून मीडिया फोटोग्राफर्सने तिच्या गाडीचा पाठलाग केला. मात्र दीपिका वांद्रे येथील लॅंड्स एँड हॉटेलमध्ये पोहचली. त्यादरम्यान मीडिया फोटोग्राफर्स गाडीचा पाठलाग करत असल्याचे दीपिकाच्या ड्रायव्हरच्या लक्षात आले. त्यानंतर तिचा बॉडीगार्ड गाडीतून खाली उतरला आणि मीडिया फोटोग्राफर्संना अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. मात्र हा वाद वाढत गेला आणि दीपिकाला स्वतःला गाडीतून बाहेर पडावे लागले. या संपूर्ण प्रकारावार भडकलेल्या दीपिकाने मीडियाला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, दीपिका, शकुन बत्रा यांच्या सिनेमाचे शूटिंग गोव्यात करत होती. परंतु, NCB चौकशीसाठी दीपिका मुंबईत परतली. ड्रग्स प्रकरणावरुन झालेल्या चौकशीमुळे दीपिका काहीशी अस्वस्थ असून गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियापासूनही दूर असल्याचे पाहायला मिळत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)