निसर्ग चक्रीवादळामुळे सलमान खानच्या फार्महाऊसचं मोठं नुकसान; यूलिया वंतूर ने शेअर केले फोटोज्
तसेच काही ठिकाणी प्रंचड नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडले. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी प्रंचड नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडले. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या पनवेल (Panvel) येथील फार्महाऊसलाही (Farmhouse) निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे सलमान खानच्या या फार्महाऊसचे मोठे नुकसान झाले आहे. सलमान खानची गर्लफ्रेन्ड युलिया वंतूर (Iulia Vantur) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फार्म हाऊसचे फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. (वाचा - जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि बोनी कपूर यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; 3 कर्मचारीही झाले कोरोनामुक्त)
युलियाने निसर्ग चक्रीवादळ येण्यापूर्वीचे आणि तसेच त्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत. युलियाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये फार्म हाऊसचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सलमान खानच्या फार्म हाऊसमधील झाडं उन्मळून पडले आहेत. काही झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत.
युलिया आणि जॅकलिन फर्नांडिस सध्या सलमानच्या फार्म हाऊसवर आहेत. सलमान खान देखील फार्म हाऊसमध्ये अडकून पडला आहे. सलमान खान देखील आपल्या परिवारापासून दूर आहे. परंतु, तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत अपडेट देत असतो.