जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि बोनी कपूर यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; 3 कर्मचारीही झाले कोरोनामुक्त
बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी आज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. यात त्यांनी आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगितलं आहे. या सर्वांचे कोरोना (Coronavirus) रिपोर्टस् नेगेटिव्ह आले आहेत.
बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी आज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. यात त्यांनी आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगितलं आहे. या सर्वांचे कोरोना (Coronavirus) रिपोर्टस् नेगेटिव्ह आले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरातील 3 कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. परंतु, सध्या या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचंही बोनी कपूर यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून ते 14 दिवसांच्या क्वारंटाईनमधून बाहेर पडले आहेत. (हेही वाचा - COVID-19: अक्षय कुमार याने मुंबई पोलीस आणि डॉक्टरांच्या कार्याला सलाम करत 'रख तू हौंसला' म्हणणारे शेअर केले नवे गाणे)
बोनी कपूर यांनी आपल्या ट्विटर वर यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, माझ्या दोन्ही मुलींचे आणि माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, हे सांगताना मला आनंद होत आहे. याशिवाय माझ्या घरातील 3 स्टाफ कर्मचाऱ्यांचे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. परंतु, सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. आमचे 14 दिवसांचे क्वारंटाईन आता संपले आहे.'
Happy to share that while my daughters & I had always been tested negative, our 3 staff members who had tested positive for Covid19, have fully recovered & tested negative. Our 14 day home quarantine period has also ended & we look forward to starting afresh @mybmc @MumbaiPolice
— Boney Kapoor (@BoneyKapoor) June 5, 2020
दरम्यान, बोनी कपूर यांनी या पोस्टमध्ये मुंबई महानगरपलिका (Mumbai Municipal Corporation) आणि मुंबई पोलिस (Mumbai Police) यांना टॅग केलं आहे. काही दिवसांपूर्वी लोखंडवाला परिसरातील ग्रीन एकड़ सोसाइटी (Green Acre Society) मध्ये बोनी कपूर यांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे बोनी कपूर यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली होती. परंतु, बोनी कपूर यांनी सर्व काही ठिक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांची काळजी मिटली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2020 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

