Cruise Ship Drug Case: ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ला दिलासा नाही; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Watch Video)
क्रूज शिप ड्रग पार्टी प्रकरणी (Cruise Ship Drug Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) 8 आरोपींना मुंबई न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
क्रूज शिप ड्रग पार्टी प्रकरणी (Cruise Ship Drug Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) 8 आरोपींना मुंबई न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणाची सुनावणी आता विशेष एनडीपीएस (NDPS) कोर्ट करेल. कोर्टात सतीश मानेशिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली होती. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने म्हटले की जामीन अर्जावर ते उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुनावणी घेतील.
एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान आणि इतर 7 आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. ते म्हणाले की, या प्रकरणात एनसीबी अजूनही अनेक ठिकाणी छापे घालत आहे आणि म्हणूनच या आरोपींना त्यांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर, आता सर्व आरोपींना फक्त एनसीबी कार्यालयात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येईल, कारण यावेळी कोणताही तुरुंग नवीन आरोपींना घेणार नाही.
मानशिंदे यांनी सुनावणीपूर्वी आर्यनला भेटण्यासाठी न्यायालयाकडे दोन मिनिटांचा वेळ मागितला होता. न्यायाधीशांनी त्याला परवानगी दिली. मनेशिंदेसोबतच शाहरुख खानचा व्यवस्थापकही आर्यनला भेटायला आला होता. एनसीबीच्या वतीने एएसजी अनिल सिंह यांनी चर्चेत भाग घेतला.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात गुरुवारी एकूण 9 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यामध्ये 8 जणांच्या सुनावणीपूर्वी अर्चित कुमारला 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. एनसीबीच्या मते, अर्चितकडून 2.6 ग्रॅम गांजा सापडला होता आणि एनसीबीचे म्हणणे आहे की अर्चित एक ड्रग पुरवठादार आहे. एनसीबीनुसार, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीत अर्चितचे नाव पुढे आले होते. मात्र, अर्चितच्या वकिलाने एनसीबीचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: Aryan Khan Arrested: आर्यन खानला अटक केल्यांनतर Shah Rukh Khan ला भेटण्यासाठी Salman Khan पोहोचला मन्नतवर)
2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईच्या किनाऱ्यावरील एम्प्रेस क्रूझ जहाजावर एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. पा पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन होत असल्याचे एनसीबीने सांगितले. या छाप्यानंतर आतापर्यंत आर्यन खानसह 18 जणांना अटक करण्यात आली आहे.