COVID-19 Vaccination Anthem Song: देशातील लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कैलाश खेर यांनी सादर केले खास गीत (Watch Video)
देशभरात लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांचे ऑडिओ-व्हिज्युअल गाणे आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंह पुरी आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांचे खास गाणे सादर केले आहे. आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्या हस्ते हे गाणे लॉन्च करण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli), पीएनजी सचिव तरुण कपूर (Tarun Kapoor), मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि तेल आणि वायू पीएसयू देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे गाणे तेल आणि वायू PSU द्वारे निर्मित आहे. (पुण्यामध्ये Money Heist स्टाईलमध्ये लसीकरणाची जनजागृती, Watch Video)
गाणे लॉन्चिंग दरम्यान बोलताना पुरी म्हणाले की, "भारत पुढील आठवड्यात 100 कोटी लसींचे लक्ष्य साध्य करणार आहे. मार्च 2020 मध्ये देश लॉकडाऊनमध्ये होता आणि भारत पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याच्या आयातीवर अवलंबून होता. पण अल्पावधीतच आम्ही या सर्व गोष्टी देशांतर्गत तयार करू शकलो आणि आता आम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी अधिक सज्ज आहोत. प्रत्येकाच्या योगदानामुळे आणि पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे हे शक्य झाले."
पहा व्हिडिओ:
"या काळात ज्यांनी कारात्मक कथा तयार करण्याचा प्रयत्न केला ते अपयशी ठरले, ही अत्यंत समाधानाची बाब आहे," असंही ते म्हणाले. तसंच कोविड विरुद्धच्या लढाईने जनआंदोलनाचे रुप घेतले. व्हायरस हा शत्रू असून त्याच्याशी लढण्यासाठी सर्वजण दोन हात करत आहेत. खेर यांचे हे गाणे लसीकरणांसंबंधित अफवांना दूर करण्यासाठी आणि त्याबाबतची जागरुकता वाढण्यास मदत करेल, असेही ते म्हणाले.
तर मांडवीया म्हणाले की, "देशात 97 कोटीहून अधिक लसीकरण झाले आहे. सरकार आणि लोकांनी स्वदेशी लस विकसित करण्यात आमच्या शास्त्रज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय बंधुत्वावर विश्वास दाखवला आणि मग प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे आम्ही देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि इतक्या मोठ्या संख्येने लस वितरीत करण्यास सक्षम आहोत. इतक्या कमी कालावधीत लसीकरणाचे कठीण काम करण्यास सक्षम झालो."
या गाण्यासंबंधित कैलाश खेर म्हणाले की, "संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर त्यात इतरांना प्रेरणा देण्याचे गुण देखील आहेत. भारत एक महान राष्ट्र आहे जिथे जनता आपली क्षमता आणि कामगिरी ओळखते. परंतु काही गैरसमज आहेत जे दूर करणे आवश्यक आहे." पुढे ते म्हणाले की, "प्रेरक गाण्यांद्वारे जागृती निर्माण केली जाऊ शकते. हे गाणे अफवांना दूर करण्यासाठी आणि लसीच्या स्वीकार्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला."