COVID-19: Rajnikanth यांच्या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील 7 जणांना कोरोनाची लागण
साउथ सुपरस्टार यांच्या चित्रपटाच्या सेटवरील जवळजवळ 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेते रजनीकांत (Rajnikanth) यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. साउथ सुपरस्टार यांच्या चित्रपटाच्या सेटवरील जवळजवळ 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हैदराबाद मध्ये रजनीकांत यांच्या ज्या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येत आहे तेथूनच ही बातमी समोर आली आहे. क्रू मेंबर्स यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशी ही चर्चा आहे की, संबंधित लोकांची सुद्धा कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.(Jug Jugg Jeeyo: वरुण धवन, नीतू कपूर यांची COVID19 वर मात, चंदीगढ मध्ये पुन्हा सुरु होणार शूटिंग)
ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद मध्ये रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या 7 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.(Rakul Preet Singh Tests Positive For COVID-19: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
Tweet:
उल्लेखनीय आहे की, रजनीकांत आपल्या चित्रपटाच्या कामासह राजकीय क्षेत्रात ही सक्रिय झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, ते पुढील महिन्याच आपला राजकीय पक्ष सुद्धा स्थापन करु शकतात. तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 पूर्वी कमल हसन यांनी सुद्धा रजनीकांत यांच्यासोबत गठबंधन करण्याचे संकेत देत असे म्हटले आहे की, ते यावर बातचीत करण्यास तयार आहेत.