कोरोना व्हायरस वरील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आनंद, ट्विट करत दिली 'ही' माहिती

या लसीकरणाच्या मोहिमेनंतर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

भारत सरकारकडून कोविड19 च्या विरोधात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. या लसीकरणाच्या मोहिमेनंतर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी असे म्हटले की, मला अपेक्षा आहे की देश लवकरच कोरोनामुक्त होईल. भारतात डीसीजीआयने या महिन्याच्या सुरुवातीलाच सीरम इंस्टिट्युट कडून तयार करण्यात आलेल्या ऑक्सफर्डच्या कोविड19 लस कोविशील्ड आणि भारत बायोटेक यांची कोवॅक्सिन लसीचा वापर आपत्कालीन स्थितीत करण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यानंतर लसीकरण सुरु झाले आहे.

अमिताभ बच्चन यांनी लसीकरणाच्या मोहिमेच्या सुरुवातीला आनंद व्यक्त करत म्हटले की, हा गर्वाचा क्षण असून आपण भारताला पोलियो मुक्त बनवले. तर आता भारताला कोविड19 मुक्त बनवणार असून तर हा सुद्धा एक गर्वाचा क्षण असणार आहे. जय हिंद. भारतातील जनता ही पोलियो प्रमाणेच कोरोनाचा सुद्धा समूळ नाश करणार आहे.(अखेर अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील Caller Tune हटवली जाणार; त्याऐवजी ऐकू येणार 'ही' कॉलर ट्यून)

Tweet:

वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्या, अमिताभ बच्चन अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट ब्रम्हास्र मध्ये दिसून येणार आहे. यामध्ये अमिताभ यांच्याव्यतिरिक्त रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सुद्धा असणार आहे. या व्यतिरिक्त सैराट फेम नागराज मंजुशे दिग्दर्शित चित्रपट झुंड मध्ये दिसून येणार आहे.