Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी ऋतिक रोशन, कपिल शर्मासह कलाकार मंडळी पुढे सरसावली

बॉलिवूड कलाकार हृतिक रोशन याने समाजिक भान जपत मुंबई महानगर पालिकेसाठी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत जाहीर केली आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मानेही पंतप्रधान रिलीफ फंडाला 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Hrithik Roshan | (Picture Credit: Instagram)

मुंबईसह महाराष्ट्रात वाढता कोरोना व्हायरसचा विळखा पाहता आता विविध स्तरामधून मदतीचा ओघ पुढे आला आहे. अनेक खासदार, आमदारांनी आपलं वेतन सहाय्यता निधीला दान केलं आहे. आरोग्य क्षेत्राला आणि वैद्यकीय मदतीसाठी कॉर्परेट क्षेत्र पुढे आले आहे तर बॉलिवूडमधूनदेखील कलाकार मंडळी आता मदतीसाठी पुढे आले आहेत. बॉलिवूड कलाकार हृतिक रोशन याने समाजिक भान जपत  मुंबई महानगर पालिकेसाठी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत जाहीर केली आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मानेही पंतप्रधान रिलीफ फंडाला मदत जाहीर केली आहे. यासोबत कलाकार आणि खासदार सनी देओल देखील मदतीसाठी पुढे आले आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना बाधित 130 च्या वर गेले आहेत. तर देशामध्येही 700 च्या जवळ कोरोनाबाधितांचा आकडा गेल्याने आता भारतामध्येही कोरोना व्हायरसचं संकट गडद होत असल्याचं चित्र आहे. त्यापार्श्वभूमीमुळे सरकारी यंत्रणेला तात्काळ मदत मिळावी यासाठी अनेक सामाजिक संघटना समोर आल्या आहेत. Coronavirus Outbreak: एमएस धोनी याची पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना लाख रुपयांची मदत.  

ऋतिक रोशनचं ट्वीट

कोरोना व्हायरस विरूद्धचं युद्ध जिंकायचं असेल तर पुढील काही काळ लॉकडाऊनमध्येच राहण्याचा कठीण नियम जगात सगळीकडेच नागरिकांना पाळावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही समाजात कोरोना व्हायरस बाबत जनजागृती वाढावी म्हणून काम केले जात आहे. कलाकारांनी नागरिकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now