अभिनेता अनुपम खेर यांच्या मातोश्रींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याची चिंता, व्हिडिओच्या माध्यमातून झाल्या भाऊक (Video)
यामध्ये अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या मातोश्रींना नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याची काळजी लागली असून त्या भाऊक झाल्याचे सुद्धा दिसून येत आहे.
देशभरातील कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत अधिक भर पडत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचा आदेश दिला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 600 च्या पार गेल्याने सरकार यावर संकटावर मात करण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. याच पार्श्वभुमीवर अभिनेते अनुपम खेर यांच्या मातोश्री यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या मातोश्रींना नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याची काळजी लागली असून त्या भाऊक झाल्याचे सुद्धा दिसून येत आहे.
अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत असे लिहिले आहे की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देभरातील सर्व मातांप्रमाणे माझ्या आईला सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी वाटत आहे. ती असे म्हणत आहे की, तुम्हाला देशातील 130 कोटी जनतेची चिंता सतावत आहे. पण तुमची काळजी कोण घेत आहे? आईला भावना व्यक्त करताना डोळ्यातून अश्रू सुद्धा सावरता आले नाहीत. तुम्ही काळजी घ्या .आम्ही सर्वजण तुम्हाला विनंती करतो.(Coronavirus: लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर दुरदर्शन पुन्हा प्रसारित करणार रामायण-महाभारत)
त्यावर मोदी यांनी ट्वीटवर अनुपम खेर यांच्या मातोश्रीच्या ट्वीटला रिट्वीट करत असे म्हटले आहे की, अशा मातोश्रींचा आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आणि काम करण्याची उर्जा देणारा आहे. त्यामुळे अनुपम खेरजी तुम्ही तुमच्या मातोश्रींना माझ्याकडून धन्यवाद सांगा.
दरम्यान,अनुपम खेर यांच्या मातोश्री नेहमीच नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा दर्शवतात. तसेच मोदी यांचे कार्य त्यांच्या मातोश्रींना आवडत असल्याने त्यांनी आता देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.