कोविड-19 पॉझिटिव्ह ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांना 'या' कारणांसाठी केले रुग्णालयात दाखल
यामुळे ऐश्वर्याचा चाहता वर्ग चिंतेत असून तिची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून काल (17 जुलै) रात्री त्यांना मुदंबईतील (Mumbai) नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले. यामुळे ऐश्वर्याचा चाहता वर्ग चिंतेत असून तिची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. यापूर्वी ऐश्वर्या-आराध्या या दोघींनाही होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र हलका ताप जाणवू लागल्याने ऐश्वर्यासह आराध्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
यामागचे कारण आता समोर आले आहे. फिल्मफेअर रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि आराध्याला श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ताबडतोब हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. (कोरोना व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छांसाठी मानले सर्व चाहत्यांचे आभार!, View Tweet)
फोटो:
यापूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. दरम्यान बिग बी हॉस्पिटलमधूनही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह आहेत. हॉस्पिटलमधून त्यांनी या कठीण काळात रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांचे पोस्ट करत आभार मानले होते. त्याचबरोबर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या आणि प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांनाही त्यांनी पोस्टद्वारे धन्यवाद दिले आहेत.