छपाक चित्रपटाच्या विरोधात वकिल अपर्णा भट्ट यांच्या याचिकेवर दिल्ली कोर्टाने दिला निर्णय

मात्र चित्रपट रिलिज करण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अकडला आहे. कारण छपाकच्या विरोधात वकिल अपर्णा भट्ट यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत एक याचिका दाखल करण्यात आली आहे

दीपिका पादुकोण (Photo Credits: Twitter)

येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा बहुप्रतिक्षित चित्रपट छपाक रिलिज होणार आहे. मात्र चित्रपट रिलिज करण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अकडला आहे. कारण छपाकच्या विरोधात वकिल अपर्णा भट्ट यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, अॅसिट हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी हिचा खटला गेल्या काही वर्षांपासून लढला. मात्र तरीही निर्मात्यांनी  मला कोणतेही क्रेडिट दिलेले नाही. त्याचमुळे आता चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर आता कोर्टाने निर्णय देत असे म्हटले आहे की, निर्मात्यांनी लक्ष्मी यांच्या वकिलांना चित्रपटात क्रेडिट देण्यात यावे.

गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण आणि तिचा हा चित्रपच काही लोकांच्या निशाणावर आहे. खरंतर CAA च्या विरोधात आंदोलन करणाऱ्या JNU विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या प्रकारानंतर दीपिका त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला पोहचली. मात्र काहींना दीपिकाची तेथील उपस्थिती पटलेली नाही. त्यानंतर सोशल मीडियात सातत्याने दीपिकावर सुद्धा टीका केल्या जात आहेत.(दीपिका पादुकोण हिची JNU भेट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर ; #BoycottChhpaak vs #IsupportDeepika म्हणत सुरु झाला ट्विटवॉर)

दरम्यान दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटात दीपिका पादुकोण अॅसिड हल्ल्याची पीडिता लक्ष्मी हिची भुमिका बजावत आहे. एवढेच नाही दीपिका या चित्रपटाची प्रोड्युसर सुद्धा आहे. दीपिका सोबत विक्रांत मेसी सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. येत्या 10 जानेवारीला छपाक चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना तो सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. तसेच छपाक सोबत अजय देवगण याचा तानाजी सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मात्र वकिल अपर्णा भट्ट यांच्या याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.