Cannes Film Festival 2019: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा कान्स फिल्मफेस्टिव्हल मधील रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा रॉयल लूक पाहायला मिळाला.
Cannes Film Festival 2019: यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांचा रॉयल लूक पाहायला मिळाला. मात्र काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मेट गाला 2019 मध्ये प्रियांका चोप्रा हिची तिच्या लूकमुळे खिल्ली उडवण्यात आली होती. परंतु सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांकाचा लूक अतिशय अप्रतिम दिसून आला आहे.
तर निक सोबत प्रियांकाचा लव्हेंडर कलर मधील फिश स्केलच्या आऊटफिटमध्ये दिसली. तर निकने काळ्या रंगाच्या फॉर्मल्स मध्ये दिसून आला. त्यावेळी प्रियांकासोबत फोटो सेशन करताना प्रियांका आणि निक यांचा रोमँटिक अंदाजीतल एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये निक हा प्रियांका चोप्रा हिचा ड्रेस थोडा समोरुन विस्कटलेल्या स्थितित झाल्याने तो व्यवस्थित करताना दिसून आला.(Cannes Film Festival 2019: प्रियंका चोपड़ा, कंगना रनौत, दीपिका पादुकोण ची कान्स फिल्म फेस्टिवल्सच्या रेड कार्पेटवर हजेरी Photos)
प्रियांका सोबतचे त्याचे हे वागणे पाहून तेथील उपस्थिती लावलेल्या मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या. तसेच या दोघांचे कान्स मधील लूकची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे.