Shah Rukh Khan Hospitalized: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान रुग्णालयात दाखल, IPL सामन्यादरम्यान उष्माघाताचा त्रास
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan Hospitalized) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) सामन्यादरम्यान शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास (Shah Rukh Khan Heatstroke) जाणवू लागला.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan Hospitalized) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) सामन्यादरम्यान शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास (Shah Rukh Khan Heatstroke) जाणवू लागला. त्यामुळे त्याला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मैदानावर सामना पाहात असताना बॉलिवूड अभिनेत्यासोबत त्याची मुलगी सुहाना (Suhana Khan) आणि मुलगा अबराम (AbRam) उपस्थित होते.
शाहरुख खान जल्लोषात सहभागी
IPL 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) च्या प्रभावी कामगिरीने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद दिला. आनंदी समर्थकांमध्ये संघाचा सह-मालक शाहरुख खान होता. त्याने स्टँडवर उभा राहून जल्लोष केला. कारण त्याच्या संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. किंग खानसोबत त्याची मुलं सुहाना आणि अबराम तसेच त्याची मॅनेजर पूजा दादलानी पाहायला मिळली. सुहानाच्या मैत्रिणी अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा यांच्यासह KKR सह-मालक जुही चावला आणि जय मेहता हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. (हेही वाचा, King : शाहरुख आणि लेक सुहाना खान दिसणार एकाच चित्रपटात; सिद्धार्थ आनंद यांच्या डॉनमध्ये साकारणार भूमिका)
रोमान्स किंगची सिग्निचर स्टेप
शाहरुख, सुहाना आणि अबराम यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांना हात जोडून अभिवादन केले. या वेळी शाहरुखने आपली खास सिग्नीचर स्टेप करत पोझ दिली आणि चाहत्यांचा आनंद उफाळून आला. एका हलक्या-फुलक्या क्षणी, SRK ने अनवधानाने थेट प्रक्षेपणात व्यत्यय आणला. मात्र, त्याने या प्रकाराबद्दल लगेचच माफी मागितली आणि सामन्यानंतरचे कार्यक्रम होस्ट करणारे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, आकाश चोप्रा आणि पार्थिव पटेल यांना मिठी मारली.
व्हिडिओ
'डंकी' चित्रपटाचा डंका
अभिनेता शाहरुख खान हा अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या त्याच्या 'डंकी' चित्रपटात दिसला होता. दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, तो 'टायगर विरुद्ध पठाण' मध्ये सलमान खान सोबत काम करणार आहे. जिथे त्यांची पात्रे बहुप्रतीक्षित सहकार्याने एकमेकांशी भिडतील. हा प्रकल्प 'करण अर्जुन' नंतरची त्यांची पहिली मोठी ऑन-स्क्रीन भागीदारी आहे. चित्रपटाबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
अभिनेता शाहरुख हा ऑन स्क्रीन रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जातो. त्याचे अनेक चित्रपट हे केवळ रोमँटीक कथांवर आधारलेले असतात. अलिकडे त्याने आपल्या चित्रपटांचा बाज काहीसा बदलला असला तरी त्याची मूळ कथा ही प्रेमावरच आधारीत असते. अलिकडील काही काळात त्याला चित्रपट आणि इतर कारणांनी काही वादग्रस्त प्रकरणांमधूनही जावे लागले. मात्र, काही असले तरी या अभिनेत्याला चाहत्यांचे प्रेम लाभते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)