Lockdown: अभिनेत्री राधिका आपटे सांगते 'लॉकडाऊनमुळे लंडनमध्ये अडकले, मला पाहण्यासाठी चाहते घरासमोर करतायत गर्दी'; पहा फोटोज

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसेने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशांत ठराविक काळासाठी लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील अनेक नागरिक परदेशात अडकले आहेत. यात अनेक दिग्गज कलाकारांचादेखील समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेदेखील (Radhika Apte) लंडनमध्ये (London) अडकली आहे. राधिकाने परदेशात देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मी ज्या परिसरात राहते तेथे तिला पाहण्यासाठी दररोज गर्दी होते, असं राधिकानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

Radhika Apte (PC - Instagram)

दरम्यान, राधिकाने लॉकडाऊनकाळात लंडनमध्ये अडकल्यानंतर येणारे अनुभव सांगितले आहेत. 'लंडनमध्ये भारतातील अनेक वेबसिरिज पाहिल्या जातात. या वेबसिरिजमध्ये मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे परदेशात माझी एक अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे. परिणामी दररोज माझ्या घरासमोर लोक मला पाहण्यासाठी गर्दी करतात. मला सुरुवातीला हे सर्व चांगल वाटत होतं. मात्र, नंतर या गोष्टीचा त्रास होऊ लागला आहे. दोन ते तीन वेळा मला पाहून चाहत्यांनी ओरडायला सुरुवात केली होती. हा अनुभव अत्यंत वेगळा होता, असंही राधिकाने यावेळी सांगितलं. (हेही वाचा - करण जौहर, आलिया भट्ट आणि करिना कपूर यांनी ट्रोलर्सला कंटाळून घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!)

View this post on Instagram

☀️ #cosmoindia #midstofwork #mindiselsewhere #londonstreets #summer #rawimages @keirlaird

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

राधिकाने आतापर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगू आणि तमीळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये राधिका आपटे अभिनेता रितेश देशमुखची प्रेयसी म्हणून मराठी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. त्यानंतर 'लय भारी' चित्रपटातही राधिका रितेश देशमुखसोबत दिसली होती. 2014 मध्ये राधिकाचे वेगवेगळ्या भाषेतील 9 सिनेमे रिलीज झाले होते.

View this post on Instagram

The ocean is everything a woman can be - beautiful, mysterious, wild and free 💙 Reminiscing my time spent at the beach during my last holiday with @danielwellington #danielwellington

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

View this post on Instagram

SUMMERTIME ☀️ #candid 🤔

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

View this post on Instagram

Smiling in the face of adversity #lostmybook

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

राधिकाने आतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राधिकाचं बालपण पुण्यात गेलं. राधिका पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारू आपटे यांची ती मुलगी आहे. राधिकाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे तिने आपल्या आवडीचेचं करिअर निवडले. आज राधिका आपटेने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय तिने अनेक वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now