Thalaivi: 7 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'थलाइवी' चित्रपटाच्या शुटिंगसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत दक्षिण भारतात रवाना
कंगनाने स्वत: तिच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सर्व चित्रपटांचे शूटींग थांबले होते. मात्र, आता मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटांचे शुटिंगही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कलाकारांनी त्यांच्ये उर्वरित प्रोजेक्टचे काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतदेखील (Kangana Ranaut) पुन्हा कामावर परतली आहे. कंगना रनौत 7 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर थलाइवी (Thalaivi) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. कंगनाने स्वत: तिच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
कंगनाने ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये स्वत:चे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये कंगनाच्या चेहऱ्यावरचा आनंद छळकत आहे. कंगनाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मित्रांनो आज एक खास दिवस आहे. मी आज संपूर्ण 7 महिन्यांनंतर कामावर परत येत आहे. माझ्या अत्यंत महत्वाकांक्षी द्विभाषिक प्रकल्प थलाइवी (Thalaivi) साठी मी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या वेळी तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. आशा आहे की, मी आज सकाळी शेअर केलेले सेल्फी तुम्हाला आवडतील.' (हेही वाचा - Kangana Ranaut: 'मला जोकर म्हणून चिडवायचे' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोबाबत कंगना रनौत हिच्याकडून खुलासा)
या सिनेमात कंगना रनौत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दक्षिण भारताच्या भक्कम नेत्या जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी कंगनाचे या चित्रपटातील अनेक लूकही समोर आले आहेत. कंगनाचा हा लूक सर्वांना खूपचं आवडला. मात्र, चित्रपटात वापरण्यात आलेल्या ग्राफिक्समुळे टीझर पाहून प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली.
दरम्यान, कंगना रनौतने मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीरसोबत गेल्याने गेल्या काही दिवसांत कंगनाला टीकेला सामोरं जाव लागलं. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या काळात शिवसेना आणि कंगनामध्ये मोठा शाब्दिक वाद पाहायला मिळाला.