'हे आपल्या दुष्कर्माची फळं आहेत': कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धर्मेंद्र झाले निराश; पहा व्हिडिओ

अशातचं बॉलिवुड अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांनी भारतात वाढत असलेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस हा आपल्या दुष्कर्माची फळं आहेत. सध्याच्या परिस्थीतून काहीतरी शिका आणि माणूसकीला जिवंत ठेवा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Dharmendra (PC - Instagram)

सध्या संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने (Coronavirus) विळखा घातला आहे. अशातचं बॉलिवुड अभिनेते धर्मेंद्र (Bollywood Actors Dharmendra) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांनी भारतात वाढत असलेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस हा आपल्या दुष्कर्माची फळं आहेत. सध्याच्या परिस्थीतून काहीतरी शिका आणि माणूसकीला जिवंत ठेवा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे की, मनुष्य सध्या आपल्या दुष्कर्माची फळं भोगत आहे. माणसाने माणुसकी जपली असती तर अशी वेळ आली नसती. आज मी खुप दु:खी आहे. स्वत:साठी, मुलांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा आणि माणूसकीला जिवंत ठेवा.' (हेही वाचा - 'तेरी मरेगी नानी..' म्हणत जॉनी लीवर याचे Coronavirus वर कॉमेडी सॉन्ग; हसून लोटपोट व्हाल (Watch Video))

 

View this post on Instagram

 

ऐक नेक इंसान होकर जिंदगी को जीयो, मालिक अपनी हर नीमत से झोली भर देगा आपकी

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

धर्मेंद्र यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. देशाच्या संकट काळात बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif