Sexiest Asian Male 2019: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष!
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष ठरला आहे. हृतिकने आशियातील सर्वाधित लोकप्रिय सेक्सी पुरुषाचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे केवळ 2019 या वर्षातील नव्हे तर या दशकातील सर्वाधिक सेक्सी पुरुष म्हणून हृतिकने हा बहुमान पटकावला आहे.
Sexiest Asian Male 2019: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Bollywood Actor Hrithik Roshan) आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष (Sexiest Asian Male 2019) ठरला आहे. हृतिकने आशियातील सर्वाधित लोकप्रिय सेक्सी पुरुषाचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे केवळ 2019 या वर्षातील नव्हे तर या दशकातील सर्वाधिक सेक्सी पुरुष म्हणून हृतिकने हा बहुमान पटकावला आहे. ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकाने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आलं आहे. जगभरातील चाहत्यांनी केलेल्या मतदानानंतर टॉप 50 सेक्सी पुरुषांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात हृतिक पहिल्या स्थानावर आहे. तर अभिनेता शाहिद कपूर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच अभिनेता विवियन डिसेनाने तिसरा तर टायगर श्रॉफने चौथ्या क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये पाकिस्तानी वंशीय ब्रिटीश गायक जायन मलिक पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच सर्वांचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा - Best Marathi Movies of 2019: 'आनंदी गोपाळ' यांच्यातील अतूट नातं ते 'हिरकणी' ची शौर्यगाथा, हे आहेत या वर्षातील Top 10 मराठी चित्रपट)
View this post on Instagram
When you become the pose. Or has the pose become you?
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on
दरम्यान, हा मान मिळवल्यानंतर हृतिकने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी हृतिक म्हणाला की, 'एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवले आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता? आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते? याचं निरीक्षण करून मी तो व्यक्ती कसा हे ठरवत असतो.'
हेही वाचा - Bigg Boss 13: पाहा रश्मी देसाई काय म्हणाली तिच्या Marriage Plans विषयी
मागील महिन्यात हृतिक रोशन व टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. ‘वॉर’ चित्रपटातील हृतिक रोशन व टायगर श्रॉफच्या दबरजस्त अॅक्शनमुळे या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘उरी’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. हृतिकच्या हटके फॅशनमुळे त्याला 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखलं जातं. काही महिन्यांपूर्वी हृतिकचा 'सुपर 30' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात त्याने आयआयटीसाठी गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)