Alia Bhatt Hollywood Debut: आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज! Gal Gadot सोबत करणार काम

आलियाने हार्ट इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Alia Bhatt (PC-Instagram)

Alia Bhatt Hollywood Debut: बॉलीवूड अभिनेत्री ​​आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने पडद्यावर बंपर कमाई केली आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी आणखी एक बातमी येत आहे. बॉलिवूडमध्ये धमाल केल्यानंतर आता आलिया हॉलिवूडमध्ये पाऊल (Alia Bhatt Hollywood Debut) ठेवण्यासाठी सज्ज आहे. आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती वंडर वुमन गॅल गॅडॉट (Gal Gadot)सोबत काम करणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) असे या चित्रपटाचे नाव असून याचे दिग्दर्शन टॉम हार्पर (Tom Harper) करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आलिया भट्टच्या हॉलिवूड पदार्पणाची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर माहिती शेअर करताना तरण आदर्शने लिहिले की, 'आलिया भट्ट नेटफ्लिक्स चित्रपट हार्ट ऑफ स्टोनमध्ये गॅल गॅडोटसोबत दिसणार आहे. ती जागतिक स्तरावर पदार्पण करणार आहे.' परंतु, आलिया भट्टच्या भूमिकेबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. (वाचा - Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला टायटॅनिक फेम अभिनेता Leonardo Dicaprio; 76 कोटीं रुपये केले दान)

या बातमीवर शिक्कामोर्तब करत आलियानेही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. आलियाने हार्ट इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आलिया भट्टने गेल्या वर्षी विलियम मॉरिस एजन्सी (WMA) या आंतरराष्ट्रीय टॅलेंट एजन्सीसोबत करार केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

दरम्यान, बॉलीवूड स्टार अली फजलने अलीकडेचं 'डेथ ऑन द नाईल' या चित्रपटात गॅल गॅडोटसोबत काम केले आहे. या चित्रपटात खुनाचे रहस्य दाखवण्यात आले होते. ज्यामध्ये गॅल गॅडोटने वधूची भूमिका केली होती तर मिर्झापूर स्टार तिचा चुलत भाऊ बनला होता.