BoleChudiyan: नवाजुद्दीन सिद्दीकी सोबतच्या 'बोले चुडिया' चित्रपटातून मौनी रॉय हिला 'या' कारणामुळे काढले

नवाजुद्दीन सोबत मुख्य भुमिकेतून झळकणारी मौनी हिला काही कारणास्तव चित्रपटातून काढण्यात आले आहे.

BoleChudiyan Poster (Photo Credits-Twitter)

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांचा आगामी चित्रपट 'बोले चुडिया' (BoleChudiyan) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटासंबंधीत वाद निर्माण झाला असून नवाजुद्दीन सोबत मुख्य भुमिकेतून झळकणारी मौनी हिला काही कारणास्तव चित्रपटातून काढण्यात आले आहे. याबद्दल चित्रपट निर्माते राजेश भाटिया यांनी माहिती दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी मौनी रॉय ही तिच्या कामाबद्दल खुप निष्काळजी असल्याचे म्हटले आहे. तसेच चित्रपटाच्या स्क्रिप्टमधील तिचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचसोबत मोजक्याच वेळा मौनी हिने वर्कशॉप आणि रिडिंग सेशनमध्ये आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिच्या अशा वागण्यामुळे काढून टाकण्यात आले आहे. तर आता निर्मात्यांकडून बोले चुडिया चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीला घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.(BoleChudiyan: नवाजुद्दीन सिद्धिकी- मौनी रॉय यांचा 'बोले चुडिया' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित)

मात्र मौनी हिने यापूर्वीसुद्धा चित्रपटात काम केले असून त्यामध्ये यशस्वी झाल्याचे तिच्या विश्वासू व्यक्तीने सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला राजेश भाटिया यांनी मौनी हिच्या वागण्यामुळे टीका केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif