Nia Sharma Bold Video: नागिन फेम अभिनेत्री निया शर्माने केले बोल्ड फोटोशूट; ब्लॅक साडीतील व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिच्या फोटोशूटपैकी एक असल्याचे समजतयं.
Nia Sharma Bold Video: छोट्या पडद्यावरची हॉट अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या हॉट आणि बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नियाने तिच्या अतिशय हॉट फोटो आणि व्हिडिओंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती तिच्या हॉटनेसमुळे नेहमीचं चर्चेत असते. सध्या नियाचा एक बोल्ड व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिच्या फोटोशूटपैकी एक असल्याचे समजतयं.
नियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "काळ्या जादूवर कधीच विश्वास नाही केला." व्हिडिओमध्ये नियाच्या काळ्या रंगाच्या साडीतील बोल्ड अवतारामुळे चाहत्यांवर जादू केली आहे. (वाचा - Antim: Salman Khan सोबत 'अंतिम' चित्रपटात रोमांस करणार दाक्षिणात्य अभिनेत्री Pragya Jaiswal; पहा अभिनेत्रीचे Hot Photos)
टीव्ही जगातील नामांकित अभिनेत्री निया नेहमीचं तिच्या मादक शैलीने आणि सुंदर अवतारामुळे चाहत्यांना प्रभावित करत असते. टीव्ही शो 'नागीन' मधील तिची भूमिका सर्व प्रेक्षकांना खूपचं आवडली होती. याशिवाय ती 'ट्विस्टेड' (2017-18) वेब सीरिज तसेच 'जमाई राजा 2.0' मध्येही दिसली आहे. तिचे बर्याच हॉट आणि बोल्ड फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत असतात. तिच्या या फोटोंना चाहते लाईक्स तसेच कमेंट्स करतात.