काळवीट शिकार प्रकरण: सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह अन्य कलाकारांना जोधपुर हायकोर्टाने 'या' कारणामुळे धाडली नोटीस

मात्र या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने हायकोर्टात अपील केले होते.

सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

काळवीट शिकार प्रकरणाशी निगडीत महत्वाची बातमी समोर येत आहे. या बातमीमध्ये जोधपुर (Jodhpur) हायकोर्टाने सैफ अली खान (Saif Ali Khan), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), तब्बू (Tabbu), नीलम कोठारी (Neelam Kothari) आणि दुष्यंत सिंह (Dushyant Singh) या कालारांना नोटीस धाडण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य न्यायमूर्ती यांनी सलमान खान ह्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचसोबत सैफ, तब्बू, नीलम आणि सोनाली व दुष्यंत सिंह यांना माफ केले होते. मात्र या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने हायकोर्टात अपील केले होते.

या प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान ह्याने 1-2 ऑक्टोबर,1998 रोजी रात्रीच्या वेळी एका काळवीटाला गोळी मारुन शिकार केली होती. त्याचसोबत तब्बू, सैफ, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांनी सलमान ह्याला शिकार करण्यास भाग पाडल्याचा आरोप लावण्यात आला होता.

सलमान खान ह्याने सीजीएम कोर्टाद्वारे सुनावण्यात आलेल्या 5 वर्षाच्या शिक्षेविरुद्ध जिल्हास्तरीय कोर्टात अपील केल होते. 22 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी न झाल्याने ती आता 3 एप्रिल रोजी होणार आहे.