Himanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती
आतापर्यंत अनेक नेते तसेच दिग्गज कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातील अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातचं आता सलमान खानच्या (Salman Khan) ‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली पंजाबी कलाकार हिमांशी खुराना (Himanshi Khurana) ला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. हिमांशीने स्वत: यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे. याशिवाय आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही हिमांशीने केलं आहे.
Himanshi Khurana Tests Positive For COVID-19: देशात कोरोना विशाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत अनेक नेते तसेच दिग्गज कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातील अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातचं आता सलमान खानच्या (Salman Khan) ‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली पंजाबी कलाकार हिमांशी खुराना (Himanshi Khurana) ला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. हिमांशीने स्वत: यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे. याशिवाय आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही हिमांशीने केलं आहे.
सध्या केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे विविध राज्यात या विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत. पंजाबमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये हिमांशीने सहभाग घेतला होता. त्यानंतर तिला कोरोना विषाणूची लागण झाली. (हेही वाचा - Movie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स)
दरम्यान, हिमांशीने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व काळजी घेऊनदेखील मला कोरोना विषाणूची लागण झाली. मी कृषी विधेयकाविरोधात केलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी तेथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे मला स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी असं वाटलं. त्यानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. आंदोलन करणाऱ्यांना माझी विनंती आहे की, अजूनही कोरोना संकट कायम आहे. त्यामुळे कृपया स्वत:ची योग्य ती काळजी घ्या,' असंही आवाहनदेखील हिमांशीने नागरिकांना केलं आहे.
भारतात कोरोना विषाणूचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 59 लाखाहून अधिक झाला आहे. याशिवाय आतापर्यंत हजारो नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे.