Rhea Chakraborty ला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; काय आहे प्रकरण? वाचा
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ आणि वडील यांच्या विरोधात सीबीआयने जारी केलेल्या लूक आऊट परिपत्रकाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ला सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने जारी केलेले लुक आउट परिपत्रक (Look-out-Circulars) आता रद्दच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. न्यायालयाने रियाचा भाऊ आणि तिच्या वडिलांनाही दिलासा दिला आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ आणि वडील यांच्या विरोधात सीबीआयने जारी केलेल्या लूक आऊट परिपत्रकाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सीबीआयची याचिका -
प्राप्त माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ आणि वडिलांच्या याचिकेवर सीबीआयचे लुक आऊट सर्क्युलर रद्द केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे रिया आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा -Rhea Chakraborty Summons In HIBOX Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांची नोटीस)
ऑगस्ट 2020 मध्ये, रिया, तिचा भाऊ, तिचे वडील आणि तिची आई यांच्याविरुद्ध लूक आउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी बिहारमधील पाटणा येथे गुन्हा दाखल करून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. (हेही वाचा - Rhea Chakraborty Viral Video: रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त)
दरम्यान, चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले होते. यावर रियाचे कुटुंबीय उच्च न्यायालयात पोहोचले होते. रियाच्या याचिकेवर हायकोर्टाने लुक आऊट सर्कुलर रद्द केले होते.