Zinda Song: ‘भारत’ सिनेमातील देशभक्तीपर 'जिंदा' गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

जिंदा गाणं भारत सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) याने लिहले असून स्मृती मोंका,मुरिश्का डिस्क्रुज,अमन त्रिखा, राजीव सुदर्शन,अमनदीप सिंग जॉली अशा गायकांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

Zinda Song (Photo Credits: You tube)

Bharat Movie Song Zinda: सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'भारत' (Bharat) येत्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून दिवशी प्रदर्शित होणार आहे. अवघ्या महिन्याभरावर प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या या सिनेमातील 'जिंदा' गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. देशभक्तीपर या गाण्यामध्ये सलमान खानच्या चित्रपटातील विविध भूमिकांची झलक पहायला मिळते.

जिंदा गाणं

जिंदा गाणं भारत सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) याने लिहले असून स्मृती मोंका,मुरिश्का डिस्क्रुज,अमन त्रिखा, राजीव सुदर्शन,अमनदीप सिंग जॉली अशा गायकांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

सलमान खानसोबत या सिनेमात कॅटरिना कैफ, तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर आदी कलाकार झळकणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापासून एका सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदलतं ते 'भारत' सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सलमान खानचे वयाच्या विविध टप्प्यातील चेहरे, देहबोली या सिनेमातील आकर्षण आहे.